Accident: ६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अजिंठा घाटात अपघात

अजिंठा घाटात उतरत असताना अचानक समोरून ट्रक आला असून ब्रेक निकामी झाल्यामुळे अजिंठा घाटात जाणारी ही बस पलटी झाली.

529
६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अजिंठा घाटात अपघात

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. येथील अजिंठा घाटात ६६ प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. (Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, अजिंठा घाटात रावेत आगाराच्या पुणे-रावेर बसचा अचानक ब्रेक निकामी झाल्यामुळे मोठा अपघात झाला. अजिंठा घाटात उतरत असताना अचानक समोरून ट्रक आला असून ब्रेक निकामी झाल्यामुळे अजिंठा घाटात जाणारी ही बस पलटी झाली. या बसमध्ये ७ ते ८ प्रवासी जखमी झाले असून या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : वीर सावरकर यांचं नाव घेण्याची हिंमत तुमच्यात आहे का? अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल)

घाटात बस उलटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात ७ ते ८ प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.