अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीचा अकोला जिल्ह्यातील पातूर घाटातील नवीन बायपासवर भीषण अपघात झाला. त्यांचे कुटुंबिय या गाडीत होते. या अपघातात ६ जण ठार झाले, तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Accident)
या अपघातातील मृतांमध्ये रघुवीर अरुणराव सरनाईक (२८), अस्मिता अजिंक्य आमले (९ महिने,) शिवानी अजिंक्य आमले (३०) सिद्धार्थ यशवंत इंगळे (३५, रा. पास्टुल), शंकर ठाकरे (रा. पास्टुल) व सुमेध इंगळे यांचा समावेश आहे, तर जखमींमध्ये पियुष देशमुख (११), सपना देशमुख (४१) तर श्रेयस सिद्धार्थ इंगळे (३ महिने ) हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पातुर पोलीस करीत आहेत. या अपघातात आमदार किरण सरनाईक यांच्या पुतण्याचा मृत्यू झाला आहे.
(हेही वाचा – UPI Transactions : एप्रिल महिन्यात युपीआय व्यवहारांत घट)
अकोला जिल्ह्यातील पातूर घाटातील नवीन बायपास रस्त्यावरील नानासाहेब मंदिरासमोर २ वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये २ चिमुकल्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. अपघातातील सरनाईक कुटुंब हे वाशिमवरून अकोल्याकडे जात होते.
दरम्यान, चारपदरी असलेल्या अकोला- वाशिम मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक एकाच रस्त्यावर वळविण्यात आली होती. त्यामुळेच ही दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने हा अपघात झाला.
हेही पहा –