- सचिन धानजी,मुंबई
कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे निवडणूक रिंगणात उतरले आहे. नारायण राणे हे निवडणूक रिंगणात उतरले आणि राडा झाला नाही असे कधी घडले नाही. राडा झाल्याशिवाय राणे निवडून येत नाही आणि जेव्हा वाद आणि राडा होत नाही तेव्हा राणे पडतात अशी काहीशी समज जनतेची बनलेली आहे. त्यामुळे यासर्व प्रथा आणि परंपरेला छेद देत कोकणातील दादा निवडून येतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, यापूर्वीच्या चुकीचे प्रायश्चित करण्याची संधी कोकणातील जनतेला प्राप्त झाली असून कोकणाला नावलौकिक देणाऱ्या राणेंना निवडून देतात की दहा वर्षांपूर्वी कोकणाचे प्रतिनिधीत्व करणारे राऊतांवरच विश्वास दाखवतात हे येणाऱ्या ७ मेच्या मतदानाच्या दिवशी स्पष्ट होईल. (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha 2024)
आताच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात २००९ पर्यंत कुलाबा, राजापूर आणि रत्नागिरी असे लोकसभा मतदार संघ होते, सन २००८मध्ये या लोकसभा मतदार संघांची पुनर्रचना झाली आहे आणि त्यातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा नवीन मतदार संघ तयार झाला आहे. त्यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ रत्नागिरीतील चिपळूणपासून ते सिंधुदुर्गातील सावंतवाडीपर्यंत पसरला आहे. सन २००९पर्यंत या मतदार संघाचे नाव राजापूर होते आणि सन २००८ मध्ये पुनर्रचनेनंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग असे नामकरण करण्यात आले आणि सन २००९च्या निवडणुकीत शिवसेनेचे सुरेश प्रभू यांचा पराभव केला. (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha 2024)
(हेही वाचा – Crime: अमरावतीत ३ आरटीओ अधिकाऱ्यांना अटक, चोरीच्या ६ ट्रकच्या पुनर्नोंदणी प्रकरणी कारवाई)
शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसची राणेंना साथ
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदान संघामध्ये मागील दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत हे सलग दोनदा निवडून आले आहेत. मात्र यंदा त्यांच्यासमोर निलेश राणे यांच्या ऐवजी आता नारायण राणे उभे ठाकले आहेत. नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे राणे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक अत्यंत चुरसदार ठरणार आहे. आणि राणे हे यंदा प्रथमच कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तसेच वांद्रे पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रत्यक्ष निवडणुकीत न उतरणार राणे हे लोकसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे कोकणात विनायक राऊत यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आजवर काँग्रेसच्या चिन्हावर आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार म्हणून निलेश राणे यांचे विनायक राऊत यांच्यासमोर आव्हान होते. पण यंदा नारायण राणे यांचे प्रमुख आव्हान असून ते भाजपाचे उमेदवार म्हणून उभे आहेत. शिवाय शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ त्यांना आहे. त्यामुळे विनायक राऊत यांना विजयाची हॅट्रिक करणे तेवढे सोपे दिसत नाही असे म्हटले जात आहे. (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha 2024)
या मतदार संघात उद्योगाचा मुद्दा महत्वाचा आहे. तसेच बारसू रिफायनरीचा मुद्दा समोर आहे. रिफायनरीला स्थानिक पातळीवर विरोध आहे. यांत्रिकीकरणामुळे स्थानिक मच्छिमारांना येत असलेल्या अडचणीसुध्दा महत्वाच्या आहेत. शिवाय पर्यटनाचा मद्दाही आहे. पर्यटनाचा व्यवसाय वाढावा यासाठी आवश्यक सेवा सुविधांची मोठी कमतरता दिसून येत आहे. या मतदार संघात बेरोजगारी, रिफायनरीसह विविध प्रकल्प, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अनेक मुद्दे महत्वपूर्ण आहेत. मागील दहा वर्षांपासून याठिकाणी शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार विनायक राऊत हे असले तरी प्रत्यक्षात हे प्रश्न निकालात काढण्यात त्यांना यश आलेले नाही. राऊत हेच विकास प्रकल्पांना हेतुपुरस्सर विरोध करत असल्याची टीका होत आहे. शिवाय जिल्ह्यातील आंबा बागायतददार हे हापूसला हमी मिळावा म्हणून आग्रही आहेत, तर काजुला २०० रुपये हमीभाव मिळावा म्हणून काजू बागायतदार आग्रही आहेत. या बागायदारांच्या समस्या सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले नाही की विरोधकही त्यावर आवाज उठवताना दिसले नाही. (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha 2024)
(हेही वाचा – Sharad Pawar यांनी बारामतीत काढले शेवटचे ‘प्रतिभा’स्त्र)
राणे म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे राणे
भविष्यात कोकणात उद्योगधंदे यावेत यासाठी प्रयत्न करणार आहे. तुम्ही मला निवडून दिले तर मी तुम्हाला रोजगार देऊन बेरोजगारी मिटवेन. कोकणाचा कॅलिफोर्निया करेन. मी कुठेही असलो तरी मी कोकणाचा विकास करेन, असे भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांनी आपल्या प्रचारसभेत बोलतांना कोकणवासियांना आश्वासन दिले. एवढेच नाही तर ही आपली शेवटची निवडणूक असून त्यानंतर आपण निवडणूक लढवणार नाही असे भावनिक आवाहनही राणे यांनी केले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना आपल्या विजयाची पूर्ण खात्री असून आजवर नारायण राणे आणि त्यांच्या मुलाला शिवसेनेने वारंवार हरवले असून आता पुन्हा एकदा हरवू असे त्यांनी बोलून दाखवले आहे. (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha 2024)
मात्र, आजवर राणे हे काँग्रेसच्या तिकीटावर लढले होते, परंतु आता स्वत:च्या व्होट बँकसह भाजपासह मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांना साथ आहे. त्यामुळे राणे यांचा पराभव होणार असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात या मतदार संघातील विजय हा जादुई ठरणार आहे. कोकणवासियांच्या म्हणण्यानुसार, राणे म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे राणे असे समिकरण बनले आहे. राणेंच्या नावामुळे कोकणची ओळख होते. राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकणची ओळख करून दिली आहे. विनायक राऊत हे कोकणचे असले तरी सन २०१४ नंतर कोकणी लोकांना त्यांची ओळख झाली. परंतु कोकणातील जनतेच्या हृदयात विनायक राऊत यांच्या पेक्षा राणेंना अधिक स्थान असल्याचे पहायला मिळत आहे. राणेंमुळे आज कोकण प्रगत झाले असून उद्योगधंदे, तसेच इतर प्रकल्प राबवले गेले आहेत. ज्यामुळे कोकणातील लोक जे पूर्वी मुंबईत रोजगारासाठी येत होते, ते प्रमाण आता मुंबईत येण्याचे कमी झाल्याचेही ऐकायला मिळत आहे. आणि याचे श्रेय कोकणातील जनता नारायण राणेंना देत आहेत. (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha 2024)
(हेही वाचा – ‘मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है’ ; CM Eknath Shinde यांची तूफान फटकेबाजी)
सन २००९ची लोकसभा निवडणूक निकाल
निलेश राणे (काँग्रेस पक्ष) ३ लाख ५३ हजार ९१५ मते
सुरेश प्रभू (शिवसेना) ३ लाख ०७ हजार १६५ मते (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha 2024)
सन २०१४ची लोकसभा निवडणूक निकाल
विनायक राऊत (शिवसेना) ४ लाख ९३ हजार ०८८ मते
निलेश नारायण राणे (काँग्रेस) ३ लाख ४३ हजार ०३७ मते (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha 2024)
सन २०१९ची लोकसभा निवडणूक निकाल
विनायक राऊत (शिवसेना) ४ लाख ५८ हजार ०२२ मते
निलेश नारायण राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) २ लाख ७९ हजार ७०० मते
नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस पक्ष) ६३ हजार २९९ (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community