Lok Sabha Election 2024 : रविंद्र वायकर आणि यामिनी जाधव यांनी भरले उमेदवारी अर्ज

180
Lok Sabha Election 2024 : उमेदवारांसाठी रात्र थोडी, सोंगे फार

लोकसभा निवडणुकीकरता (Lok Sabha Election) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उत्तर मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर आणि दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज अनुक्रमे उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय आणि शहर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. (Lok Sabha Election 2024)

उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून या मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा असतानाच माजी मंत्री व आमदार रविंद्र वायकर यांच्या नावाची घोषणा शिवसेनेच्यावतीने दोनच दिवसांपूर्वी करण्यात आली. तसेच दक्षिण मुंबईतील जागा शिवसेनेच्या ताब्यात आल्यानंतर या मतदार संघातून भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केले. रविंद्र वायकर उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालयात आपला निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वायकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी म्हाडा गेटपासून भव्य रॅली काढली होती. (Lok Sabha Election 2024)

New Project 2024 05 03T203036.668

(हेही वाचा – Accident: ६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अजिंठा घाटात अपघात)

निवडणूक जिंकणे हेच उद्दिष्ट – रविंद्र वायकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार ॲड. आशिष शेलार, खासदार गजानन किर्तीकर, माजी मंत्री दीपक सावंत, आमदार विद्या ठाकूर, आमदार अमित साटम, आमदार भारती लव्हेकर, आमदार राजहंस सिंह, आमदार दिलीप लांडे, शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे, सिद्धेश कदम, शालिनी ठाकरे, योगेश परुळेकर, नगरसेवक सदानंद परब, स्वप्नील टेंबवलकर, रेखा रामवंशी आदी उपस्थित होते. तर याप्रसंगी बोलतांना रविंद्र वायकर यांनी आपण ३५ वर्षे राजकारणात असून निवडणूक जिंकणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. (Lok Sabha Election 2024)

तर दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांनी शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, खासदार मिलिंद देवरा, शिवसेनेच्या मिना कांबळी, मनसेचे संजय नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र राणे आदींसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक, भाजपा, मनसैनिक, रिपाइं व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील जीपीओपासून प्रचार निघाली होती. यावेळी यामिनी जाधव यांनी आपण मोठ्या मताधिक्यांनी विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.