Rohit Vemula: रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी स्मृति ईराणी यांच्यासह सर्व आरोपींना क्लीन चिट

अनेक कारणांमुळे तणावग्रस्त स्थितीत असल्यामुळे रोहित वेमुलाने आत्महत्या केली.

156
Rohit Vemula: रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी स्मृति ईराणी यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी शुक्रवारी एक क्लोजर रिपोर्ट दाखल केला. या अहवालात सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, विधान परिषद सदस्य एन रामचंद्र राव, कुलगुरू अप्पा राव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीवीपी) नेते तसेच महिला आणि बाल विकास मंत्री स्मृति ईराणी यांच्यासह सर्व आरोपींना क्लीन चिट दिली आहे. (Rohit Vemula)

अनेक कारणांमुळे तणावग्रस्त स्थितीत असल्यामुळे रोहित वेमुलाने आत्महत्या केली. त्याच्या आईने त्याच्यासाठी बनावट अनुसूचित जाती (एससी) प्रमाणपत्र काढणे, कॅम्पसमधील राजकारणामुळे त्याची शैक्षणिक कामगिरी चांगली नसणे, अशी काही त्याच्या तणावाची कारणे अहवालात नोंद करण्यात आली आहेत. ”मृत व्यक्तीच्या शिक्षणाचा विचार करता, असे दिसून येते की, तो अभ्यासापेक्षाही कॅम्पसमधील विद्यार्थी राजकारणात अधिक व्यस्त होता. त्याने त्याची पहिली पीएचडी २ वर्ष केल्यानंतर बंद केली आणि दुसरी पीएचडी करायला सुरुवात केली. यातही अशैक्षणिक कामांमुळे फारशी प्रगती दिसून आली नाही.” एवढेच नाही, तर “आपल्या आईने आपल्यासाठी एससी प्रमाणपत्राची व्यवस्था केली आहे, याची कल्पनाही रोहितला होती तसेच आपल्या सहकाऱ्यांना याची माहिती मिळाली, तर आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो, अशी चिंताही त्याला वाटत होती, असेही या अहवालात म्हणण्यात आले आहे.

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024 : मतदानाची आकडेवारी जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक – एस. चोक्कलिंगम )

या अहवालानुसार, “आपण अनुसूचित जातीचे नाही आणि आपल्या आईने आपल्यासाठी एससी प्रमाणपत्र मिळवले आहे, हे मृत व्यक्तीला माहीत होते. हेदेखील भीतीचे एक कारण असू शकते. कारण हे उघड झाले असते, तर त्याला अनेक वर्षे मिळवलेल्या शैक्षणिक पदव्या गमवाव्या लागल्या असत्या आणि खटल्याला सामोरे जावे लागले असते. अशा प्रकारे, मृताला अनेक मुद्दे त्रासदायक झाले होते. जे त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करू शकत होते. सर्वोतोपरी प्रयत्न करूनही, आरोपींच्या कृत्यांमुळे मृताला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले, हे सिद्ध करणारा कुठलाही पुरावा मिळाला नाही.

तेलंगणामध्ये १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि मतदानाच्या केवळ १० दिवस आधीच हा अहवाल आला आहे. १७ जानेवारी २०१६मध्ये हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये २६ वर्षीय रोहित वेमुलाने आपल्या वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती आणि एका ठिकाणी निदर्शनही झाले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.