माविआ सरकार पडणार याची अजित पवारांना आधीच कल्पना दिली होती, Tanaji Sawant यांचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवारांना कल्पना दिल्यानंतर अवघ्या २ महिन्यात सरकार पाडल्याचा दावाही तानाजी सावंत यांनी केला आहे.

241
माविआ सरकार पडणार याची अजित पवारांना आधीच कल्पना दिली होती, Tanaji Sawant यांचा मोठा गौप्यस्फोट

देशभरात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election 2024) प्रचारसभा सुरू आहेत. या निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या उमेदवार एकमेकांवर झाडत असतात. भाषणांच्या वेळी नेते मंडळी भाषणांमध्ये असं काही बोलून जातात की अनेकांच्या भुवया उंचवतात. असच एक विधान शिवसेनेचे मंत्री तानाजी शिंदे (Minister Tanaji Shinde) यांनी केलं आहे. दोन महिन्यांपूर्वीच महाविकास आघाडी पडणार यांची कल्पना उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांना दिली होती, असा गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी केला.     (Tanaji Sawant)

(हेही वाचा – Accident: ६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अजिंठा घाटात अपघात)

महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पूर्वकल्पना देऊनच महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केला आहे. मी जे काही बोलतो, ते करून दाखवतो. अजितदादा उपमुख्यमंत्री असताना त्यांना कल्पना दिली अन् अवघ्या दोन महिन्यात सरकार पाडलं, असा दावा तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये एका खासगी कार्यक्रमात बोलताना केली आहे. एकीकडे लोकसभा निवडणूक सुरू असताना तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) मोठी खळबळ उडाली आहे.  (Tanaji Sawant)

(हेही वाचा – Kurla Bhabha Hospital : रुग्णाच्या नातेवाईकांकडून नर्सना शिवीगाळ, आता नेमणार अतिरिक्त सुरक्षा रक्षक )

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील (Dharashiv Lok Sabha Constituency) महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील (Archanatai Patil) यांच्या प्रचारार्थ परंडा तालुक्यातील लोणी येथे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत आणि महायुतीचे मान्यवर लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची प्रचार सभा संपन्न झाली. त्यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं कौतूक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ४०० खासदारांमध्ये धाराशिवचा खासदार आपला असला पाहिजे, असं म्हणत तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.   (Tanaji Sawant)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.