Konkan Railway: गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे आरक्षण खुले!

177
Konkan Railway: गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे आरक्षण खुले!
Konkan Railway: गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे आरक्षण खुले!

गणेशोत्सव (Ganeshotsav) हा कोकणातील (Konkan Railway) सर्वात मोठा सण मानला जातो. गणेशोत्सव यंदा ७ सप्टेंबरला साजरा होत आहे. यासाठी कोकण रेल्वेचे (Konkan Railway) आगाऊ आरक्षण आजपासून (४ मे) सुरू होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमानी पंधरा दिवस आधीपासूनच गावी मुक्कामाला जातात. गणपतीसाठी रेल्वेचे (Konkan Railway) तिकिट मिळवणे हे एक दिव्यच असते. दरवर्षी कोकण रेल्वेकडून (Konkan Railway) प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतात. गणपतीसाठी तिकिट बुक करायचं म्हटलं तर दोन महिने आधीपासूनच, तिकिट काढावे लागतात. तर कुठे तिकिट कन्फर्म होते. (Konkan Railway)

गणेशभक्तांना मोठा दिलासा

त्यामुळे भाविकांना पाच महिने आधीपासूनच ट्रेनचे तिकिट आरक्षित करता येणार आहे. त्यामुळं गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, नियमित रेल्वे गाड्यांसह व गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी चाकरमान्यांची चढाओढ सुरूच राहणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात लाखो लोक जातात. या दिवसात कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे बुकिंग फुल असते. त्यामुळं काहीजणांना अधिकचे पैसे देऊन ट्रॅव्हर्ल्स किंवा खासगी गाडी करुन जावे लागते. (Konkan Railway)

तासन् तास रांग लावूनही चाकरमान्यांच्या पदरी निराशाच

अनेकदा तर रेल्वेचे तिकिट मिळेल यांसाठी चाकरमानी पहाटेपासूनच तिकिट खिडक्यांवर रांग लावून उभे राहतात. मात्र, तासन् तास रांग लावूनही चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडते. तिकिट खिडक्यांबरोबरच ऑनलाइन तिकिट आरक्षित करण्यासाठीही प्रवाशांची झुंबड उडालेली असते. कोकण रेल्वे मार्गावर नेमक्या किती गणपती स्पेशल ट्रेन चालवणार आहेत हे मात्र अद्याप कोकण रेल्वेने जाहिर केलेले नाही. (Konkan Railway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.