Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकारने हटवली

145
Lok Sabha Election Result 2024 : कांद्याने केला 'या' मतदारसंघात वांदा

सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरु (Onion Export) आहे. या निवडणुकांच्या काळातच सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या निर्यातीसंदर्भात (Onion Export) केंद्र सरकारनं (Central Government) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवली आहे. दरम्यान, एका बाजूला जरी निर्यातबंदी हटवली असली तरी, दुसऱ्या बाजूला 550 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात शुल्क (Export Duty) लागू करण्यात आलं आहे. निर्यात शुल्क आकारल्यामुळे देशात कांद्याच्या किंमती वाढणार नाहीत, याची दक्षता सरकारने घेतल्याचं बोललं जात आहे. (Onion Export)

शेतकऱ्यांनाही निश्चित फायदा होणार

निर्यात मूल्याने कांद्याची निर्यात (Onion Export) करणे शक्य होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं 7 डिसेंबर 2023 ला निर्यातबंदी लागू करण्यात आल्याने याचा मोठा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसत होता. यानंतर NCEL च्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू करण्यात आली होती. मात्र याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. अखेर काल रात्री केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे निर्यातदारांनी स्वागत केले असून, यामुळे शेतकऱ्यांनाही निश्चित फायदा होणार असल्याच म्हटलं आहे. (Onion Export)

देशी हरभऱ्याला आयात शुल्कातून सूट

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत देशी हरभऱ्याला आयात शुल्कातून सूट दिली आहे. त्याचप्रमाणे, पिवळ्या वाटाण्यांवरील आयात शुल्काची सूट 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्व बदल 4 मे पासून म्हणजेच आजपासून लागू करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. (Onion Export)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.