Marathwada Water Crisis: मराठवाड्यात पाणीस्थिती भीषण, चार धरणांमध्ये शून्य ट्क्के पाणीसाठा

157
Marathwada Water Crisis: मराठवाड्यात पाणीस्थिती भीषण, चार धरणांमध्ये शून्य ट्क्के पाणीसाठा
Marathwada Water Crisis: मराठवाड्यात पाणीस्थिती भीषण, चार धरणांमध्ये शून्य ट्क्के पाणीसाठा

मराठवाड्यात पाणीस्थिती (Marathwada Water Crisis) भीषण असल्याचे दिसत आहे. अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात आजघडीला फक्त 17 टक्के पाणीसाठा (Marathwada Water Crisis) शिल्लक असल्याची चिंताजनक माहिती आहे. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 17.30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या 11 प्रकल्पापैकी 3 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. चिंताजनक बाब म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त 8 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती देखील समोर येत आहे. (Marathwada Water Crisis)

(हेही वाचा –Heat waves: थंड हवेच्या ठिकाणी उष्णतेच्या झळा, पर्यटन व्यवसाय मंदावला!)

दुसरीकडे, उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने मराठवाड्याला तब्बल 1 हजार 424 टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. हिंगोली (Hingoli) जिल्हा वगळता इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक संख्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात 569 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहेत. परभणी जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे पाच टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. (Marathwada Water Crisis)

(हेही वाचा –Konkan Railway: गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे आरक्षण खुले!)

पाण्याचे टँकर भरण्यासाठी व विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या विभागातील 2 हजार 83 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 304, जालना 413, परभणी 38, हिंगोली 49, बीड 322, नांदेड 57, लातूर 272 तर धाराशिव जिल्ह्यात 628 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. टँकरसाठी 727, टँकर व्यतिरिक्त 1356 अशा 2083 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. (Marathwada Water Crisis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.