उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, ५ मे २०२४ (5th May 2024) रोजी रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या (Central Railway MegaBlock) मार्गावर मेगाब्लॉक (MegaBlock) घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी – वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.
(हेही वाचा – Konkan Railway: गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे आरक्षण खुले!)
मध्य रेल्व – (Central Railway)
कुठे- माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर
कधी- सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत
परिणाम-
या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.
(हेही वाचा – Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकारने हटवली)
हार्बर मार्ग- (Harbor Railway)
कुठे- सीएसएमटी ते चुनाभट्टी / बांद्रा अप आणि डाउन मार्गावर
कधी- सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यत
परिणाम-
ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि बांद्रा-गोरेगाव दरम्यानची लोकल वाहतूक पुर्णपणे बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांकरिता कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन पनवेल करिता दर २० मिनिटांनी स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवासी रविवारी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करु शकतात.
(हेही वाचा – BMC : मुंबईतील सहा मोटार गॅरेजवर जप्ती, मालमत्ता कर थकवला)
पश्चिम रेल्वे – (Western Railway)
कुठे – मुंबई सेंट्रल ते माहीम अप आणि डाउन जलद मार्गावर
कधी – रविवारी रात्री १२.१५ ते पहाटे ४. १५ वाजेपर्यत
ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. तसेच काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी ५ मे २०२४ रोजी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community