Raj Thackeray: मनसेने कधीच कोणाशी युती का केली नाही? राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं

245
Raj Thackeray: मनसेने कधीच कोणाशी युती का केली नाही? राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं
Raj Thackeray: मनसेने कधीच कोणाशी युती का केली नाही? राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. तसेच मनसेने आजवर कोणत्याही पक्षाशी युती किंवा आघाडी का केली नाही यावरही भाष्य केलं. राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “राजकारणात आम्ही आजवर इतरांसाठी अस्पृश्य राहिलो आहोत.” यावेळी राज ठाकरे यांना विचारण्यात आलं की, जागावाटप तुम्हला कधी जमलं नाही असं तुम्ही गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सांगितलं होतं. ते का जमत नाही? राज ठाकरे म्हणाले, तो माझा स्वभावच नाही. (Raj Thackeray)

(हेही वाचा –Heat waves: थंड हवेच्या ठिकाणी उष्णतेच्या झळा, पर्यटन व्यवसाय मंदावला!)

जागावाटपच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “मी १९९५ साली शेवटचा जागावाटपाच्या चर्चेला बसलो होतो, शिवसेनेसाठी तेव्हा त्या बैठकीत बसलो होतो. माझ्यासमोर भाजपाकडून प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि इतर काही नेते होते. तर, आमच्याकडून म्हणजेच शिवसेनेकडून मी होतो, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि सुभाष देसाई यांच्यासह काही इतर नेते त्या बैठकीला होते. मी तेव्हा २६ वर्षांचा होतो. त्या वयात एक वेगळा जोश असतो. मात्र गेल्या १८ वर्षांत माझ्यावर जागावाटपाच्या चर्चेला बसण्याची कधी वेळच आली नाही. निवडणुका आल्या. पक्षाचे उमेदवार जाहीर केले की माझं काम झालं. त्यानंतर थेट प्रचार, तुम्ही पाच जागा घ्या, मला इतक्या जागा द्या. दोन जागा तिकडे सरकवा. माझ्या दोन जागा इकडे द्या. ही असली चर्चा मला जमतच नाही. पुढच्या वेळी म्हणजेच भविष्यात कधी तशी वेळ आलीच तर माझ्या पक्षातले लोक जागावाटपाच्या चर्चेला जातील.” (Raj Thackeray)

(हेही वाचा –IMD : येत्या ३६ तासांच्या कालावधीत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता)

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तुम्ही मोदींविरोधात भूमिका घेतली. तुमचं ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्य देशभर गाजलं. तुम्ही मोदींविरोधात कडवी भूमिका घेतलेली असताना, त्यांच्याविरोधात प्रचार करत असताना इतरांनी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तुम्हाला बरोबर घेण्याचा विचार का नाही केला? यावर राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “नाही, खरंतर यांना (महाविकास आघाडी) सत्तेवरून हकलवण्यात आलं आहे. यांचे पक्ष फुटले आहेत म्हणून आज हे लोक विरोधात आहेत. आज मोदींना किंवा भाजपाला विरोध करण्यासाठी हे लोक जी काही कारणं देत आहेत ती बोगस आहेत. केवळ यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही, म्हणून आज हे विरोधात आहेत. त्यावेळी यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर आज हे भाजपाच्या किंवा मोदींच्या विरोधात बोलले असते का? यांना काहीतरी हवं होतं, जे मिळालं नाही म्हणून आज यांनी विरोधातील भूमिका घेतल्या आहेत. मला जेव्हा जेव्हा, ज्यांच्या ज्यांच्या भूमिका पटल्या नाहीत त्यावर मी ठामपणे बोललो आहे. मला काही गोष्टी आजही पटत नाहीत आणि मी त्या उघडपणे बोलतो.” असं राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं. (Raj Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.