जळगावमध्ये पहिल्याच दिवशी ५२ जणांचे ‘Home Voting’ द्वारे मतदान ; २ दिवस चालणार प्रक्रिया 

शुक्रवार पासून "होम वोटिंग" सुरू झाली असून, ५२ मतदारांनी मतदान केले.

161
जळगावमध्ये पहिल्याच दिवशी ५२ जणांचे ‘Home Voting’ द्वारे मतदान ; २ दिवस चालणार प्रक्रिया 

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) यंदापासून लोकसभेच्या मतदानासाठी (Lok Sabha election 2024) प्रथमच ८५ वर्षांवरील, आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदानाचा (Home Voting) (घरातून पोस्टल मतदान करण्याची मुभा) पर्याय उपलब्ध करून दिला. अशांसाठी शुक्रवार पासून होम वोटिंग प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी जळगावमध्ये ५२ जणांनी होम वोटिंगचा (Jalgaon Home Voting) लाभ घेतला असून, पहिले मतदान रावेर लोकसभा मतदारसंघातील सावदा (ता. रावेर) येथील सुशीला राणे यांनी सकाळी १० वाजून ३६ मिनिटाला केले. मात्र, ५५ मतदारांनी मतदान करणे अपेक्षित असताना, ५२ ज्येष्ठ मतदारांनी मतदान केले, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांनी दिली. तसेच यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आणि सीईओ अंकीत उपस्थित होते. 

(हेही वाचा – Raj Thackeray: मनसेने कधीच कोणाशी युती का केली नाही? राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं)

जळगाव जिल्ह्यात (८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी) १ हजार ५२५ जणांनी होम वोटिंगसाठी अर्ज (1,525 people applied for home voting) केले आहेत. तर यासाठी ११९ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक संबंधित नागरिकांच्या घरी जावून बॅलेट पेपरवर मतदान करून घेतील. तसेच मतदारांच्या घरी चहा, पाणी, नाश्‍ता घेऊ नका. मतदारांना मतदान प्रक्रियेची सूचना द्या. मात्र, त्यांना कोणाला मतदान करा, असे सांगू नका. मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करा. मात्र, कोणाला मतदान करणार आहेत याचे चित्रीकरण करू नका. मतदारांच्या घरी गर्दी होणार नाही. पक्षाचे पदाधिकारी मतदानावेळी नसतील, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी पथकांना दिल्या आहेत.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.