Ajit Pawar : रोहित पवारांचा कट्टर समर्थक अजित दादांच्या राष्ट्रवादीत 

पक्ष प्रवेश करत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपावली.

203
Ajit Pawar : रोहित पवारांचा कट्टर समर्थक अजित दादांच्या राष्ट्रवादीत 

लोकसभा २०२४ च्या (Lok sabha Election 2024) निवडणुकीचे २६ एप्रिल पर्यंत मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्याचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला आहे. बारामती लोकसभा (Baramati Loksabha Election) मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) आणि शरद पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.  दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर मतदारांचे मोठं प्राबल्य असल्याने दोन्ही पवारांकडून धनगर नेत्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थकाने साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

(हेही वाचा – Baramati Lok Sabha Election: बहिणीने भावाच्या घरी जास्त थांबायचं नसतंय, ‘या’ नेत्याचा सुप्रिया सुळेंना इशारा)

हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज 

रोहित पवारांचे कट्टर समर्थक अक्षय शिंदे (Akshay Shinde) यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश प्रवेश देत थेट राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष (Youth Congress State Vice President) पदाची जबाबदारी सोपवली आहे. अक्षय शिंदे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज (Descendant of Punyashlok Ahilya Devi Holkar) आहेत. मुंबईमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत अक्षय शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे. अक्षय शिंदे हे सुरुवातीपासूनच रोहित पवार यांच्यासोबत सक्रिय राजकारणात कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार आणि अक्षय शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येत होते.

(हेही वाचा – जळगावमध्ये पहिल्याच दिवशी ५२ जणांचे ‘Home Voting’ द्वारे मतदान ; २ दिवस चालणार प्रक्रिया )

अक्षय शिंदे हे मूळचे चौंडी येथील असून रोहित पवार यांचे कट्टर समर्थक होते. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अक्षय शिंदे यांनी रोहित पवार यांना कर्जत जामखेड या विधानसभा (Karjat Jamkhed Assembly) मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. रोहित पवार यांच्या विजयात अक्षय शिंदे यांचा मोठा वाटा होता. (Ajit Pawar)

हेही पाहा –  

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.