बारामती (Baramati) तालुक्यातील डोर्लेवाडी येथे शनिवारी (४ मे) झालेल्या सभेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभेला संबोधित केलं. यावेळी अजितदादांनी आपला मास्टरप्लॅन सांगितला. देशात पुन्हा मोदी सरकार आले तर मी तुमच्या विकासासाठी कशाप्रकारे निधी आणू शकतो, हे अजित पवार (Ajit Pawar) यांनी मतदारांना पटवून दिलं. बारामतीचं चित्र मी बदलून दाखवीन, असंही ते म्हणाले.
… नाहीतर पुढची पिढी मला माफ करणार नाही
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “जे विरोधात आहेत, ते उसाला पाणी देतात पण त्यांना कळत नाही, हे पाणी महायुतीने आणले. नाहीतर इथे धुरळा झाला असता धुरळा. मी कामाचा माणूस आहे. हे चित्र मी बदलून दाखवीन. फक्त भावनिक होऊ नका. कोण आपल्याला कॅनॉलला पाणी देऊ शकेल, कोण आपल्या समस्या सोडवू शकेल, याचा विचार करा. तुम्ही सातवेळा मला निवडून दिले, पाचवेळा मी उपमुख्यमंत्री झालो. त्यामुळे माझी अनेक लोकांशी ओळख झाली. तुम्ही बघितलं असेल, मी पुण्याच्या सभेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी कशा गप्पा मारत होतो. मी त्यांच्याशी विकासाच्या गप्पा मारत होतो. आम्हाला विकासासाठी निधी पाहिजे, हे मी त्यांना सांगितले. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. नाहीतर पुढची पिढी मला माफ करणार नाही. अजित पवारने सत्तेत राहून काय केले? असा प्रश्न ते विचारतील. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भावनिक होऊन मतदान करु नका.” असे आवाहन अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.
भावनिक होऊ नका
आम्हाला वडीलधारी लोकांबाबत आदर आहे. ते जे सांगतील ते आम्ही 40 वर्षे ऐकले. आता विकासासाठी हा निर्णय घेतला. कुणाला त्रास देण्याची भूमिका माझी नव्हती. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला सुनेत्रा तडा जाऊ देणार नाही. मी कामाचा माणूस आहे, हे चित्र मी बदलून दाखवेन. फक्त भावनिक होऊ नका. असे अजित पवार यांनी सांगितले. (Ajit Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community