हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे (Nitin Gadkari) उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या प्रचारार्थ हुतात्मा स्मारक मैदानावर महाविजय सभा आयोजित केली होती. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सभेला संबोधित केलं. जनतेच्या भविष्याचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद नरेंद्र मोदी सरकारमध्येच आहे. असं ते यावेळी म्हणाले. (Nitin Gadkari)
(हेही वाचा –Baramati Lok Sabha Election: बहिणीने भावाच्या घरी जास्त थांबायचं नसतंय, ‘या’ नेत्याचा सुप्रिया सुळेंना इशारा)
गेल्या साठ वर्षात जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही या भागात केली. याचे श्रेय मोदी किंवा गडकरींना नाही तर, योग्य सरकारची निवड केली त्या जनतेला आहे. देशाला सुखी, संपन्न, समृद्ध, आत्मनिर्भर आणि अर्थव्यवस्था बळकट करुन देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न आहे. सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील महापुराचे थैमान रोखण्यासाठी अनावश्यक पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठी वॅाटर ग्रीड धोरण अंमलात आणण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. असं गडकरी म्हणाले. (Nitin Gadkari)
(हेही वाचा –Ajit Pawar: बारामतीचं चित्र मी बदलून दाखवीन; अजित पवारांनी सांगितला प्लॅन)
यावेळी आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, “आता कोणीही चिंता करण्याची गरज नाही. जो काही गोंधळ निर्माण झाला होता तो, दुर झाला असुन हुपरी गावातील तेरा गावांतून उमेदवारांना मिळणाऱ्या एकूण मतदानांपैकी साठ टक्के अधिक मते धैर्यशील माने यांना देणार आहे.” असं ते म्हणाले. (Nitin Gadkari)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community