IPL 2024, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या पराभवाला जबाबदार कोण?

IPL 2024, Mumbai Indians : कोलकाता विरुद्धच्या पराभवानंतर मुंबईचं आव्हान संपल्यात जमा आहे 

204
IPL 2024, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या पराभवाला जबाबदार कोण?
IPL 2024, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या पराभवाला जबाबदार कोण?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल (IPL 2024, Mumbai Indians) स्पर्धा यापूर्वी पाचवेळा जिंकलेल्या मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम मात्र अगदीच विसरण्यासारखा गेला आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) झालेल्या पराभवानंतर तर आव्हान संपल्यातच जमा आहे. ११ सामन्यांमध्ये हा त्यांचा आठवा पराभव आहे. वानखेडे मैदानावर कोलकाताकडून १२ वर्षांत पहिल्यांदाच मुंबई पराभूत झाली आहे. त्यानंतर नवीन कर्णधार हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) कप्तानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (IPL 2024, Mumbai Indians)

(हेही वाचा- Whatsapp Account Closure : २०२४ च्या पूर्वार्धात २.२ कोटी व्हॉट्सॲप खाती बंद)

‘मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) हा कागदावर खूप तगडा वाटणारा संघ होता. पण, व्यवस्थापन चुकलं. हार्दिच्या (Hardik Pandya) कप्तानीविषयी विचारले गेलेले सगळे प्रश्न बरोबरच होते, असं माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. शुक्रवारच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) पहिली फलंदाजी करताना १६९ धावा केल्या होत्या. पण, ते आव्हानही मुंबईला पेलवलं नाही. (IPL 2024, Mumbai Indians)

’यापैकी हार्दिकची सामन्यातील एक चूक इरफानने (irfan pathan) ठळकपणे मांडली आहे. ‘जसप्रीत बुमराच्या (Jasprit Bumrah) चांगल्या सुरुवातीमुळे कोलकाताची अवस्था ५ बाद ५७ अशी असताना नमन धीरला (Naman Dhirala) सलग तीन षटकं देण्याची काहीच गरज नव्हती. अशावेळी तुमचा मुख्य गोलंदाज असायला हवा. तो नसल्यामुळे वेंकटेश (Venkatesh) आणि मनोज पांडे (Manoj Pandey) यांची भागिदारी जमू शकली. कोलकाता दीडशेच्या आत सर्वबाद झाले असते तर मुंबईला विजयाची जास्त संधी होती,’ असं इरफान म्हणाला. (IPL 2024, Mumbai Indians)

(हेही वाचा- Axis Mutual Fund: ॲक्सिस म्युच्युअल फंडकडून ‘ॲक्सिस निफ्टी बँक इंडेक्स फंड’ची नवीन ऑफर जाहीर)

मुंबई इंडियन्सचा (IPL 2024, Mumbai Indians) संघ एकोप्याने खेळत नसल्याची टीका इरफान (irfan pathan) बरोबरच इतरही माजी खेळाडूंनी केली आहे. शिवाय हार्दिकने फलंदाजीच्या क्रमवारीतही अख्ख्या स्पर्धेत अनेक बदल केले आहेत. कोलकाता विरुद्ध फॉर्ममध्ये असलेल्या टीम डेव्हिडच्या आधी त्याने स्वत:ला संधी दिली. आणि तो चमकही दाखवू शकला नाही. टीम डेव्हिडला कमी चेंडू मिळाले. कोलकाता संघ मात्र स्पर्धेत योग्य वेळी जमून आला असल्याचं मत इरफान पठाणने व्यक्त केलं आहे. कोलकाता आता गुण तालिकेत दुसऱ्या स्थानावर भक्कम आहेत. (IPL 2024, Mumbai Indians)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.