- ऋजुता लुकतुके
मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सॲप (Whatsapp) या कंपनीने २०१४ त्या पहिली तिमाहीत भारतात जवळ जवळ २.२ कोटी खाती बंद केली आहेत. गेल्यावर्षीही या कालावधीत कंपनीने २ कोटी २३ लाख खाती बंद केली होती. भारतात व्हॉट्सॲपचे ५००० दशलक्ष ग्राहक आहेत. कंपनीसाठी हा सगळ्यात मोठा आणि विक्रमी आकडा आहे. भारतात अस्तित्वात असलेल्या माहिती व तंत्रज्ञान खात्याने लागू केलेल्या डिजिटल माडियासाठीच्या नियमांचा भंग केल्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. बंद केलेल्या व्हॉट्सॲप खात्यांमुळे कलम ४ (१) (डी) आणि नियम ३ए (७) या नियमांचा भंग होत होता. (Whatsapp Account Closure)
या कारवाया लोकांकडून संबंधित खात्यांसाठी आलेल्या तक्रारींवरून झालेल्या आहेत. व्हॉट्सॲपच्या अटी व नियमांचं उल्लंघन केल्यावरूनही कंपनीने ७० लाख खाती बंद केली आहेत. खासकरून निवडणुकांच्या जाहिराती करणाऱ्या टेलिमार्केटिंग खात्यांची संख्या यात सर्वाधिक आहे. अशा खात्यांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सॲप कंपनीने भारतीय निवडणूक आयोगाच्या मदतीने एक संयुक्त उपक्रमही हाती घेतला आहे. (Whatsapp Account Closure)
(हेही वाचा – IPL 2024 K L Rahul : के एल राहुलने लखनौ सुपर जायंट्सच्या कट्टर चाहत्याचं असं केलं स्वागत)
निवडणूक पारदर्शक आणि योग्य पद्धतीने व्हावी आणि व्हॉट्सॲपच्या (Whatsapp) माध्यमातून चुकीचे, दिशाभूल करणारे संदेश पसरू नयेत यासाठी निवडणूक आयोगाचंही इतर माध्यमांप्रमाणेच व्हॉट्सॲपवरही लक्ष आहे. त्यामुळेच कंपनीने त्यांच्या सहकार्याने एक यंत्रणा उभारली आहे. यावर्षी मार्च महिन्यात व्हॉट्सॲपने ७९ लाख खाती बंद केली होती. तर एकूणच २०२३ मध्ये खाती बंद करण्याचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे ७.९ कोटी इतकं होतं. (Whatsapp Account Closure)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community