- ऋजुता लुकतुके
केंद्र सरकारने शुक्रवारी उशिरा कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्क्यांवर आणलं आहे. तर देशी चणा आयात करायचा असेल तर त्यासाठीचं आयात शुल्क मात्र मार्च २०२५ पर्यंत माफ करण्यात आलंय. इतकंच नाही तर पिवळा वाटाण्याच्या आयतीवरील शुल्कही सरकारने माफ केलं आहे. ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंतच्या व्यवहारांना ही सूट मिळेल. (Onion Export)
या निर्णयांचं एक पत्रक केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी उशिरा जारी केलं आहे. हे बदल ४ मे पासून लागू होतील, असं या पत्रकात म्हटलं आहे. (Onion Export)
Centre lifts the ban on onion exports. In a notification, the Directorate General of Foreign Trade says that the order effective immediately is subject to a Minimum Export Price of USD 550 per Metric Ton. pic.twitter.com/lTWKBK00v1
— All India Radio News (@airnewsalerts) May 4, 2024
(हेही वाचा – Dhule : धुळ्यात वंचितला फटका; आता दुहेरी लढत होणार)
देशात डिसेंबर २०२३ पासून कांदे निर्यात (Onion Export) लागू झाली आहे. देशांतर्गत किमती आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं होतं. आताही निर्यात बंदच असली तरी काही मित्र राष्ट्रांना त्यांच्या बरोबरच्या कराराचं पालन म्हणून आपण कांदा पुरवत असतो. पण, आता सरकारने अशा निर्यातीवरील शुल्कही वाढवलं आहे. संयुक्त अरब अमिराती आणि बांगलादेश या देशांना आपण आतापर्यंत अव्याहत कांदा पुरवला आहे. यापूर्वी डिसेंबर २०२३ पर्यंत या निर्यातीवरील शुल्क हे ४० टक्केच होतं. आता पुन्हा एकदा तोच दर केंद्राने लावला आहे. (Onion Export)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community