Cotton Prices: कापसाच्या दरात क्विंटलमागे ४०० रुपयांची घसरण, उत्पादन खर्चाबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी

अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणेही सोडून दिले आहे.

115
Cotton Prices: कापसाच्या दरात क्विंटलमागे ४०० रुपयांची घसरण, उत्पादन खर्चाबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी

खुल्या बाजारात कापसाचे दर वेगाने घसरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या ८ दिवसांत कापसाच्या दरात क्विंटलमागे ४०० रुपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे. चांगल्या प्रतीचा कापूस ७०५० रुपये क्विंटल दराने विकला जात आहे, तर फरदड कापूस ५,५०० रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. यामुळे आज-उद्या कापसाचे दर वाढतील या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत व्यापाऱ्यांनी २५ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असल्याचे बोलले जात आहे, तर अद्यापही ५ टक्के शेतकऱ्यांकडे दोन ते तीन लाख क्विंटल कापूस शिल्लक असण्याचा अंदाज आहे. या शेतकऱ्यांनी मे अथवा जूनमध्ये कापसाचे दर वाढतील म्हणून कापूस रोखून ठेवला आहे. या शेतकऱ्यांना कापसाचे दर साडेआठ हजार रूपये क्विंटलच्या घरात पोहचण्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात कापसाचे दर वाढले आणि त्यात एकदम घसरण नोंदविण्यात आली. ७६०० रूपये क्विंटलपर्यंत कापसाचे दर वाढले. गत आठ दिवसात कापसाचे दर ४०० रुपयांनी खाली आले. दररोज कापसाच्या दरात क्विंटल मागे १०० रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. शुक्रवारी हे दर सर्वाधिक निच्चांकी होते. चांगल्या प्रतिच्या कापसाला ७०५० रूपये क्विंटलचे दर बाजारात कापसाला मिळाले. फरदड स्वरूपाच्या कापसाला ५५०० रूपये क्विंटलचे दर मिळाले. या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणार नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : ‘विराट सलामीला आणि रोहित तिसऱ्या क्रमांकावर…’ माजी खेळाडूने हे काय सुचवले? )

शेतकऱ्यांनी कापूस वेचणे सोडून दिले
कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नाही. मजूर मिळाले तर ते वेचाईसाठी २० ते ३० रुपये किलो वेचाईचा दर घेत आहे. बाजारात या कापसाला ५,५०० हजार रूपये क्विंटलचा दर आहे. वेचण्यालाच अर्धे पैसे संपत आहेत. इतर खर्च तर बाकीच आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणेही सोडून दिले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.