Lok Sabha Election : संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी दिग्गजांची फौज; शाहू महाराजांकडे मात्र मविआच्या नेत्यांचे दुर्लक्ष 

या मतदारसंघात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंडलिक यांच्यासाठी प्रचारसभा घेतली आहे. या ठिकाणी महाराज यांच्या बाजूने केवळ आमदार सतेज पाटील वगळता कुणीही मविआमधील नेते कोल्हापुरात प्रचारासाठी फिरताना दिसत नाही.

167

राज्यातील लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) कोल्हापूरचा मतदार संघ जोरदार चर्चेत आला आहे. याला कारण आहे या ठिकाणाहून मविआच्या वतीने काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराज छत्रपती निवडणूक लढवत आहेत. महाराज प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मात्र याठिकाणी महायुतीच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तिकिटावर संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत. मतदानाला अवघे ३ दिवस उरले आहेत, येथील निवडणूक अंतिम टप्प्यावर आली असतांना संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी दिग्गजांची फौज दिसत आहे, मात्र शाहू महाराजांकडे मविआच्या नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.

मंडलिक यांचे पारडे जड असल्याचे दिसते 

या मतदारसंघात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंडलिक यांच्यासाठी प्रचारसभा घेतली आहे. या ठिकाणी महाराज यांच्या बाजूने केवळ आमदार सतेज पाटील वगळता कुणीही मविआमधील नेते कोल्हापुरात प्रचारासाठी फिरताना दिसत नाही. महाराजांच्या घरातील सर्व सदस्य मात्र प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर याउलट संजय मंडलिक यांच्या बाजूने खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, कागलच्या राजकारणात दबदबा असणारा शाहू सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याचे अध्यक्ष घाटगे यांचे मंडलिक यांना समर्थन आहे. त्यामुळे संजय मंडलिक यांच्या बाजूने असलेल्या दिग्गजांची फळी पाहिल्यास या निवडणुकीत मंडलिक यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.  (Lok Sabha Election)

(हेही वाचा Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मविआ सरकार सोडून भाजपासोबत जायचे होते; पण…; तटकरेंचा गौप्यस्फोट

प्रचारात महाराज तुलनेने मागे पडताना दिसत

मात्र तरीही शाहू महाराज छत्रपती ही राजघराण्यातील असल्याने त्यांचाही मतदारसंघात दबदबा तितकाच दिसत आहे. परंतु त्यांच्या प्रचारासाठी मविआच्या नेत्यांकडून विशेष प्रयत्न होताना दिसत नाही, त्यामुळे प्रचारात महाराज तुलनेने मागे पडताना दिसत आहेत. महायुतीच्या वतीने ‘मान गादीला मत मोदीला’ असे धोरण ठरवले आहे. जे मतदारांपर्यंत प्रभावी ठरत आहे. निवडणुकीच्या (Lok Sabha Election) सुरुवातीच्या टप्प्यात महाराजांची हवा असलेल्या या मतदारसंघात मतदानाचा दिवस जसा जवळ आला आहे, तसे संजय मंडलिक यांचेही पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.