Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha 2024 : दोन विनायक राऊत निवडणूक रिंगणात

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.

204
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha 2024 : दोन विनायक राऊत निवडणूक रिंगणात

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण तातू राणे आणि शिवसेना उबाठा पक्षाचे विनायक राऊत यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र, या लोकसभा मतदार संघातून विनायक राऊत नावाचे अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. अपक्ष उमेदवार विनायक राऊत राजापूर तालुक्यातील असून त्यांचा अर्ज पात्र ठरला आहे. (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha 2024)

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. या मतदार संघात १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. हे सर्व अर्ज पात्र ठरले आहेत. यामध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार विनायक बाबुराव राऊत यांच्या नावाशी साधर्म्य असलेले विनायक राऊत हे निवडणूक रिंगणात उतरले आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत विनायक राऊत नावाचे दोन उमेदवार असल्याने मतदारांमध्येच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha 2024)

(हेही वाचा – North East Mumbai LS Constituency : ईशान्य मुंबईत पाच उमेदवार संजय पाटील)

राजापूर येथील राजाराम लवू राऊत यांचा प्रचार सुरु असून कोकणातील जनतेकडून या विनायक राऊत या नावाबाबतच गोंधळ निर्माण होताना पहायला मिळत आहे. अपक्ष उमेदवार विनायक राऊत यांची एकूण संपत्ती पावणे लाखांच्या घरात असून उबाठा शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांची स्थावर संपत्ती ही ६५ लाख रुपये आणि त्यांची पत्नीच्या नावे ८२ लाख ०८ हजार एवढी संपत्ती आहे. (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.