- ऋजुता लुकतुके
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनी आपला आठवा सामना गमावला आणि पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. यावेळी १७० धावांचं आव्हानही मुंबईला पेलता आलं नाही. मुंबई संघाची अवस्था ७ बाद १२७ अशी असताना टीम डेव्हिड मैदानात होता आणि त्याने मिचेल स्टार्कला षटकारही खेचला होता. तोपर्यंत मुंबईला विजयाची आशा होती. पण, स्टार्कनेच आपल्या पुढच्या षटकात डेव्हिडसह पियुष चावलालाही बाद केलं आणि तिथेच मुंबईचा पराभव स्पष्ट झाला. (IPL 2024 Mumbai Indians)
त्यानंतर वानखेडे स्टेडिअमवर जे घडलं ते या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ जिथे जाईल तिथे नेहमीचं झालं आहे. मैदानात रोहित, रोहितचा गजर सुरू झाला. नशिबाने यावेळी हार्दिकची हुर्यो फारशी उडवली गेली नाही. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (IPL 2024 Mumbai Indians)
“Rohit, Rohit, Rohit” chants in Wankhede. 🔥
– Hitman is an emotion….!!!! pic.twitter.com/GmPCDlw1wh
— Johns. (@CricCrazyJohns) May 4, 2024
(हेही वाचा – Lok Sabha Election : संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी दिग्गजांची फौज; शाहू महाराजांकडे मात्र मविआच्या नेत्यांचे दुर्लक्ष)
या सामन्यात सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूंत ५५ धावांची खेळी करुनही मुंबईचा अखेर २५ धावांनी पराभव झाला. या सामन्यातही हार्दिकच्या कप्तानीवर टीका झालीच. हंगामातील इतर सामन्यांप्रमाणेच इथंही हार्दिकने स्वत:च्या फलंदाजीच्या क्रमात सातत्य ठेवलं नाही. तो टीम डेव्हिडच्या वर फलंदाजीला आला आणि फॉर्ममध्ये असलेल्या डेव्हिडला कमी चेंडू खेळायला मिळाले. तर कोलकाताची अवस्था ५ बाद ५७ असताना हार्दिकने एखाद्या अनुभवी गोलंदाजाला चेंडू सोपवून दडपण वाढवणं अपेक्षित असताना त्याने नवख्या नमन धरला सलग तीन षटकं दिली. या कालावधीत वेंकटेश अय्यर आणि मनोज पांडे यांनी अर्धशतकी भागिदारी करून कोलकाताची धावसंख्या वाढवली. (IPL 2024 Mumbai Indians)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community