देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचे साक्षीदार होण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने जागतिक निवडणूक व्यवस्थापन संस्थांना निमंत्रण दिले आहे. याअंतर्गत २३ देशांमधील ७५ प्रतिनिधी भारत दौऱ्यावर आले आहेत. देशातील ६ राज्यांना या प्रतिनिधी मंडळाचे छोटे समूह भेट देतील, त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा दौरादेखील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी करणार आहेत.
देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूक – २०२४ दरम्यान निवडणुकीसंदर्भातील विशेष कार्यक्रम भारतीय निवडणूक आयोगाने आयोजित केला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिनिधींचा सहभाग आणि दौऱ्याचा आवाका यासंदर्भातील हा पहिलाच कार्यक्रम आहे.
भूतान आणि इस्रायलच्या प्रतिनिधींचाही सहभाग…
या दौऱ्यादरम्यान भूतान, मंगोलिया, ऑस्ट्रेलिया, मादागास्कर, फिजी, किरगीझ, रशिया, मोलदोवा, ट्युनिशिया, सेशेल्स, कंबोडिया, नेपाळ, फिलिपाईन्स, श्रीलंका, झिम्बाब्वे, बांगलादेश, कझाकिस्तान, जॉर्जिया, चिली, उझबेकिस्तान, मालद्वीज, पापुआ, न्यू गिनी आणि नामिबिया अशा २३ देशांमधील ७५ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. निवडणूक यंत्रणांसाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानचे (आयएफईएस) सदस्य तसेच भूतान आणि इस्रायल या देशांमधील माध्यमांचे प्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
आंतराराष्ट्रीय प्रतिनिधींच्या दौऱ्याचे स्वरुप ?
या कार्यक्रमात परदेशातील जागतिक निवडणूक व्यवस्थापन संस्थ्यांच्या सर्व प्रतिनिधींना भारतीय निवडणूक यंत्रणेतील बारकावे तसेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेतर्फे अंमलात आणल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींविषयी माहिती दिली जाणार आहे. रविवारी, (५ मे) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग सिंधू या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करतील त्यानंतर महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या ६ राज्यांना भेटी देण्यासाठी रवाना होतील. हे प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया आणि विविध मतदारसंघांमध्ये केल्या जाणाऱ्या तयारीचे निरीक्षण करतील. ९ मे रोजी या कार्यक्रमाचा समारोप होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community