लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 (Lok Sabha Election 2024) करीता 26- उत्तर मुंबई मतदारसंघातील (Lok Sabha constituencies) खर्च निरीक्षक हे उमेदवारांच्या प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंद वहीची तपासणी करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे (Pankaj Deore) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. (Lok Sabha Election 2024)
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांनी म्हटले आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) करीता लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha constituencies) उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च त्यांच्या खर्च नोंद वहीमध्ये नोंदविणे अपेक्षित आहे. निवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशाचा सारसंग्रह ऑगस्ट 2023 मधील सुचनेनुसार खर्च निरीक्षक हे प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवाराच्या खर्च नोंदवहीची तपासणी करणार आहेत. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवही तपासणीचे वेळापत्रक असे (अनुक्रमे तपासणी क्रमांक, दिनांक, वार आणि वेळ या क्रमाने) : प्रथम तपासणी, 7 मे 2024, मंगळवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. द्वितीय तपासणी, 11 मे 2024, शनिवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. तृतीय तपासणी, 17 मे 2024, शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. तपासणीचे ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, सातवा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051 (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा- Devendra Fadnavis: काँग्रेस अजमल कसाबसारख्या दहशतबाद्यांसोबत आहे, फडणवीसांचा पलटवार)
तपासणीसाठी उमेदवारांनी परिशिष्ट E-1, भाग ‘अ’, ‘ब’, ‘क’, खर्चाची मूळ प्रमाणक (Invoce, GST क्रमांक आदींसह परिपूर्ण), तपासणी दिनांकापूर्वी अद्ययावत बँक पासबुक/Bank Statement, सर्व परवाने (वाहन, रॅली आदी). वरील नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे खर्च लेखाच्या तपासणीसाठी उमेदवार/उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी विहीत वेळेत अभिलेख्यांसह निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 प्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांनी म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community