Mobile Game चे व्यसन लागलेल्या पाद्र्याने चर्चच्या क्रेडिट कार्डमधून लाखो रुपये केले खर्च

202

अमेरिकेत असलेल्या फिलाडेल्फियाच्या सेंट थॉमस मोर चर्चमध्ये एका पाद्य्राला मोबाईल गेम (Mobile Game) खेळण्याचे व्यसन होते. यामुळे त्याने चर्चच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून ४० हजार अमेरिकी डॉलर (३३ लाख रुपयांहून अधिक रुपये) खर्च केले. अत्याधिक खर्च केल्याचा संशय आल्यावर चर्चच्या व्यवस्थापनाने रेव्हरंड लॉरेन्स कोझाक या दोषी सिद्ध झालेल्या पाद्य्राला पदावरून काढून टाकले. २५ एप्रिल या दिवशी कोझाकवर अधिकृतपणे चोरी आणि इतर संबंधित गुन्ह्यांचा आरोप  करण्यात आला.

(हेही वाचा Vijay Wadettivar : विजय वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया; म्हणाले, हा २६/११ च्या हल्ल्यातील मृतांचा अनादर)

‘फिलाडेल्फिया इन्क्वायरर’ या कंपनीच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, कोझाक याने ‘कँडी क्रश’ आणि ‘मारियो कार्ट टूर’ यांसारख्या मोबाईलमधील खेळांसाठी (Mobile Game) चर्चचे पैसे खर्च केले. तपासाच्या वेळी असे आढळून आले की, चर्चसाठी काम करणार्‍या एका लेखापालला चर्चशी जोडलेल्या ‘क्रेडिट कार्ड’वर मोठ्या प्रमाणात ‘ऍपल व्यवहार’ आढळले. हा खर्च सप्टेंबर २०१९ मध्ये चालू झाला आणि जुलै २०२२ मध्ये कोझाक पकडला जाईपर्यंत चालूच होता. क्रेडिट कार्डच्या कर्जाचा एक भाग फेडण्यासाठी कोझाकने स्वतःकडील १० हजार डॉलर वापरले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.