Temple : श्री देव बोडगेश्वर मंदिरातील चोरी प्रकरणी एका बांगलादेशीसह ६ मुसलमानांची टोळी पोलिसांच्या ताब्यात

173

गोव्यातील म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिरात (Temple) २९ एप्रिल रोजी चोरी प्रकरणातील चारही संशयित चोरांना खोपोली (महाराष्ट्र) पोलिसांनी ताब्यात घेऊन गोव्यासह महाराष्ट्रातील काही चोर्‍यांचा छडा लावला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजू फरत शेख (वय २७ वर्षे) हा मूळचा बांगलादेशी नागरिक आहे. तसेच त्याच्यासोबत इम्रान शहीद शेख (वय २४), राकीब कुलमहंमद शेख (वय २८) आणि मुजाहिद गुलजार खान (वय २८) या तिघांनाही अटक केली. या संशयितांकडून ७ लाख रुपये रोख रक्कम, ३ मोबाईल आणि अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.

(हेही वाचा Congress : कमळालाच मत देणार म्हणणाऱ्या महिला कामगाराला काँग्रेसच्या उमेदवाराने मारली थप्पड )

मंदिरातील चोरीचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रीकरण झाले

तपासाच्या वेळी संशयितांनी म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिरासह (Temple) खोपोली येथील श्री बहिरी देव मंदिर, शीलफाटा खोपोली येथील श्री हनुमान मंदिरासह रायगड, पनवेल, सावंतवाडी आणि गोवा येथे चोरी केल्याचे मान्य केले आहे. संशयित ४ वर्षांपूर्वी सीबीडी, बेलापूर येथे वास्तव्यास होते. मंदिरातील चोरीचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रीकरण झाले होते. चौकशीच्या वेळी चोर पत्रादेवीमार्गे सावंतवाडीच्या दिशेने गेल्याचे दिसले होते. त्यानुसार गोवा पोलिसांनी महराष्ट्र पोलिसांना माहिती दिली. महाराष्ट्र पोलीस चोरांच्या मागावर होते. पोलिसांनी ३० एप्रिल या दिवशीच चोरांच्या मुसक्या आवळल्या. संशयित राजू शेख याने त्याच्या वाट्याला आलेल्या रकमेपैकी १ लाख ३३ हजार रुपये बांगलादेशमधील एका नातेवाइकाच्या बँकेत वर्ग केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. श्री देव बोडगेश्वर मंदिरात (Temple) २९ एप्रिल २०२४ या दिवशी चारही संशयितांनी सुरक्षारक्षक दशरथ ठाकूर यांना खुर्चीला बांधून २ अर्पण पेट्या फोडल्या होत्या आणि ३ गोण्या पिशव्या भरून सुमारे १० ते १२ लाख रुपये रोख रक्कम पळवली होती. खोपोली पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती म्हापसा पोलिसांना दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.