Nagpur Earthquake: सलग तिसऱ्या दिवशीही नागपुरात भूकंपाचे सौम्य धक्के, कोणत्या परिसरात हादऱ्यांची नोंद?

महिनाभराच्या काळात हा चौथा धक्का असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.

183
Nagpur Earthquake: सलग तिसऱ्या दिवशीही नागपुरात भूकंपाचे सौम्य धक्के, कोणत्या परिसरात हादऱ्यांची नोंद?

नागपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ३.११ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंपाचा धक्का होता. सौम्य पद्धतीचे धक्के बसत असले, तरीही सलग तीन दिवस धक्के बसल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मागील २ दिवसांपासून पारशवीनी आणि उमरेड या भूकंपाचे धक्के नोंदवले गेले होते. (Nagpur Earthquake)

नागपुरातील तिसरा भूकंप दुपारी ३.११ मिनिटे ९ सेकंद या वेळेत झाला. या भूकंपाची तीव्रता उत्तरेस २१.२९ लॅटित्युड, तर पूर्वेस ७.४४ लांबपर्यंत होती, अशी भूकंपाच्या धक्क्यांची नोंद नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. शनिवारीही (४ मे) नागपूर शहरात ५ किलोमीटर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.

(हेही वाचा – दिव्यांग मुलांना आधार देणारे S. Ramakrishnan )

महिन्याभरात चौथा धक्का…
शनिवारच्या दुपारी २ वाजून २४ मिनिटांनी २.४ रिक्टर स्केलच्या भूकंपाचा सौम्य धक्का बसला, याचे केंद्र कुही होते. तर शुक्रवारी दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी 2.5 रिक्टर स्केलचा भूकंप आला होता. त्यावेळी त्याचे केंद्र पारशिवनी होते. भूकंपाच्या (Earthquake) स्थितीतून अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आणि या पूर्वी क्वचितच अनुभवायला मिळालेल्या नागपूर शहरात (Nagpur) सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाच्या (Earthquake In Nagpur) धक्क्याची नोंद झालीय. तर महिनाभराच्या काळात हा चौथा धक्का असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.