Jharkhand ED Raids: झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई! नोटांचं घबाड बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

254
Jharkhand ED Raids: झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई! नोटांचं घबाड बघून अधिकारीसुद्धा चक्रावले
Jharkhand ED Raids: झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई! नोटांचं घबाड बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) झारखंडमधील (Jharkhand ED Raids) अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम (Rural Development Minister Alamgir Alam) यांचे स्वीय सचिव संजीव लाल (Sanjiv Lal) यांच्या नोकराच्या घरातून ईडीनं (Jharkhand ED Raids) मोठी रोकड जप्त केली आहे. छापेमारीत जप्त करण्यात आलेली रोकड एवढी मोठी आहे की, ईडी अधिकाऱ्यांनी आता नोटा मोजण्याच्या मशीन मागवल्या आहेत. (Jharkhand ED Raids)

भ्रष्टाचारप्रकरणी ईडीकडून तपास सुरू

याप्रकरणी ईडीनं (Jharkhand ED Raids) अटकेची कारवाई करत झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना ताब्यात घेतलं आहे. झारखंडमधील ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांच्या अंमबजावणीत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. याचदरम्यान ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी २०२३ मध्ये वीरेंद्र राम यांना अटक केली होती. (Jharkhand ED Raids)

कोण आहे आलमगीर आलम?

आलम हे पाकूर विधानसभेचे चार वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत आणि सध्या ते राज्य सरकारमध्ये संसदीय कार्य आणि ग्रामविकास मंत्री आहेत. याआधी आलमगीर आलम 20 ऑक्टोबर 2006 ते 12 डिसेंबर 2009 पर्यंत झारखंड विधानसभेचे अध्यक्ष होते. राजकारणाचा वारसा घेत आलमगीर यांनी सरपंचपदाची निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला. 2000 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि तेव्हापासून ते 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. (Jharkhand ED Raids)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.