Onion Export: एनसीसीएफ आणि नाफेड करणार पाच लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी!

135
Onion Export: एनसीसीएफ आणि नाफेड करणार पाच लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी!
Onion Export: एनसीसीएफ आणि नाफेड करणार पाच लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी!

केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी (Onion Export) उठवल्यानंतर एनसीसीएफ (NCCF) आणि नाफेडमार्फत (NAFED) पाच लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती एनसीसीएफचे अध्यक्ष विशाल सिंग (Vishal Singh) यांनी पिंपळगाव बसवंत येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. येत्या जूनपर्यंत नाशिक, पुणे, हरियाणा आणि गुजरात येथूनही पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे विशाल सिंग यांनी सांगितले. खरेदीचे लक्ष्य 5 लाख मेट्रिक टन आहे. त्यात नाफेडसाठी 2.5 आणि एनसीसीएफसाठी 2.5 मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. (Onion Export)

शेतकऱ्यांना दिलासा

केंद्र सरकारने (Central Government) ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) काळात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने कांद्यावरील निर्यातबंद हटवली (Onion Export) आहे. तसेच 550 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य (Export Duty) ठेवण्यात आले आहे. यामुळे कांद्याची निर्यात करणं शक्य होणार असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे. आता एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक, पुणे, गुजरात, हरियाणा या ठिकाणी खरेदी केंद्र असणार आहेत. (Onion Export)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.