- ऋजुता लुकतुके
मर्सिडिज बेंझ (Mercedes Benz EQA) कंपनीने इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये पाऊल ठेवल्यानंतर ईक्यू श्रेणीतल्या गाड्या बाजारात आणायला सुरुवात केली आहे. आता ख्रिस्मस आणि न्यू ईयरच्या मूहूर्तावर कंपनीने आपली सगळ्यात छोटी आणि एंट्री लेव्हलची एसयुव्ही गाडी मर्सिडिज- बेंझ ईक्यूए बाजारात आणली आहे. या गाडीसाठी बुकिंग सुरूही झालं आहे. (Mercedes Benz EQA)
(हेही वाचा- Israel-Hamas Conflict: इस्रायलने अलजझीरा वृत्तवाहिनीवर घातली बंदी ; नेतान्याहू सरकारचा आदेश)
२०२१ मध्ये कंपनीने या गाडीचं उत्पादन त्यांच्या जर्मनी आणि चीनमध्ये बीजिंग इथल्या कारखान्यात सुरू केलं. त्यानंतर लगेचच त्यांनी बनलेली पहिली कार लोकांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड केली होती. ही फॅमिली एसयुव्ही कार असून त्यात बसलेल्या लोकांना पूर्णपणे इलेक्ट्रिक म्हणजेच डिजिटल अनुभव मिळेल, असं कंपनीने या कारबद्दल म्हटलं आहे. आता हीच कार भारतातील रस्त्यांवरही आपल्याला दिसू शकेल. (Mercedes Benz EQA)
Meet the all-electric Mercedes-Benz EQA and EQB. With these compact SUVs, among others, Mercedes-Benz expects the xEV share of new car sales to reach up to 50% in the second half of the decade.
Tomorrow drives Mercedes-Benz: https://t.co/7uByEQAG8n#MercedesBenz #Sustainability pic.twitter.com/76tmWZtctS
— Mercedes-Benz (@MercedesBenz) May 2, 2024
रस्त्यावर धावणारा इलेक्ट्रिक ॲथलीट असं कंपनीने या कारचं वर्णन केलं आहे. या गाडीत अपघात टाळण्यासाठी इलेक्ट्रिक इंटलिजन्स असेल. तसंच गाडीला रस्ता दाखवणारी अत्याधुनिक यंत्रणाही असेल, असं कंपनीने म्हटलंय. मर्सिडिजच्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये हेडलँपना जोडणारी एक दिव्यांची सलग माळ असते. म्हणजे हेडलँप व्यतिरिक्त अगदी सकाळच्या प्रकाशातही ही दिव्यांची अख्खी माल तुम्ही सुरू ठेवू शकता. गाडीच्या पाठी आणि पुढे अशी दिव्यांची माळ असेल. तर हेडलँपमध्ये इतर मर्सिडिज गाड्यांना असतो तसा निळा दिवाही असेल. (Mercedes Benz EQA)
(हेही वाचा- Akola News: काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू)
ही गाडी पूर्णपणे इलेक्ट्रिक अनुभव देणारी असल्यामुळे गाडीचं इंटिरिअर बनवतानाही कंपनीने वेगळा विचार केला आहे. व्हेंटिलेशन आऊटलेट्स, डिस्प्ले अशा इतर साधनांनाही बॅकलिट असलेली निळी हलकी रेषा देण्यात आली आहे. (Mercedes Benz EQA)
या गाडीची बॅटरीही तगड्या क्षमतेची असून एकदा चार्ज केली की ती ४२५ किमीपर्यंत जाऊ शकते. तर गाडीत सिंगल इलेक्ट्रिक मोटार आहे जी १९० पीएस इतकी ऊर्जा निर्माण करू शकते. तर गाडीची बॅटरी ३० मिनिटांत ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. (Mercedes Benz EQA)
(हेही वाचा- Mumbai Metro: जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मेपर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?)
मर्सिडिजची ही एन्ट्री लेव्हल एसयुव्ही असली तरी तिची किंमत ६० लाख रुपयांपासून सुरू होत आहे. टेस्ला वाय आणि वोल्वो सी४० या गाड्यांबरोबर ईक्यूएची स्पर्धा असेल. (Mercedes Benz EQA)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community