भारत सरकारने गुगल क्रोम ब्राउझर युझर्सना महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. हॅकर्स गुगल क्रोमच्या माध्यमातून युझर्सची फसवणूक करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे युझर्सच्या बँक खात्याशी संबंधित डेटा अॅक्सेस करून आणि लॉग इन करून आर्थिक नुकसान होण्याचीदेखील शक्यता असते. (Google Crome)
हॅकर्सची फसवणूक होऊन त्यांना नाहक भुर्दंडाला बळी पडावे लागू नये यासाठी सरकारने गुगल क्रोम ब्राउझरना सांगितले आहे की, सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला गुगल क्रोमच्या काही आवृत्त्यांमध्ये काही त्रुटी आढळून आल्याचे वृत्त आहे. यानुसार, हॅकर्स गुगल क्रोममधील त्रुटींचा वापर करून त्यांच्या पद्धतीने अनियंत्रित कोड तयार करू शकतात. यामुळे त्यांना युझर्सची संवेदनशील माहिती मिळण्याची शक्यता असते, असे सरकारने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
(हेही वाचा – UPI Fraud : UPI खाते सुरक्षित कसे ठेवाल? जाणून घ्या)
सरकारने केलेल्या आवाहनानुसार,
– गुगल क्रोम युझर्सनी त्यांचे गुगल क्रोम त्वरीत अपडेट करण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. हॅकर्सकडून होणारा धोका टाळण्यासाठी गुगल क्रोम ब्राउझर अपडेट ठेवा .
– याकरिता सर्वप्रथम स्वत:चे गुगल क्रोम सुरू करा.
– वरच्या बाजूला दिलल्या तीन बिंदूंवर क्लिक कराय
– सबमेन्यूमधून गुगल क्रोमची निवड करा.
– यानंतर गुगल क्रोम अपडेट आपोआप तपासेल, जर काही अपडेट असतील तर अपडेट सुरू होईल.
– अपडेट पूर्ण झाल्यानंतर गुगल क्रोमची नवीन आवृत्ती पुन्हा लॉंच करा.
-स्मार्टफोनमध्येही गुगल क्रोम वापरत असाल, तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करू शकता.