- ऋजुता लुकतुके
शनिवारी गुजरात टायटन्स विरुद्ध तगडा विजय मिळवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपल्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा नक्कीच जिवंत ठेवल्या आहेत. या तिसऱ्या सलग विजयानंतर बंगळुरूचा संघ आता गुणतालिकेत दहाव्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर पोहोचला आहे आणि ११ सामन्यांतून त्यांचे ८ गुण झाले आहेत. बाद फेरीत पोहोचायचं असेल तर त्यांना उर्वरित तीन सामनेही मोठ्या फरकानेच जिंकावे लागतील. आणि त्याचबरोबर इतर सामन्यांचा निकालही मनासारखा लागेल याची वाट पहावी लागेल. शक्यता नेमक्या काय असतील ते पाहूया, (IPL 2024 RCB)
पहिली शक्यता – सगळ्यात आधी त्यांना उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. त्यामुळे १४ सामन्यांत ७ विजयांसह त्यांचे १४ गुण होतील. सध्या त्यांची धावगती उणे ०.०४५ इतकी आहे. हे विजय मिळवल्यावर ती सुधारेल अशी आशा आहे. आणि तसं झालं तर इतर सामन्यांच्या निकालानंतर त्यांना बाद फेरीची अपेक्षा ठेवता येईल. (IPL 2024 RCB)
दुसरी शक्यता – बंगळुरूने तीनही सामने जिंकले की, त्यांचं लक्ष लखनौ आणि हैद्राबाद या इतर दोन संघांवर असेल. या दोनपैकी एका संघाने उर्वरित सामन्यांत एकापेक्षा जास्त सामना जिंकता कामा नये. सध्या या दोन्ही संघांनी १० सामन्यांतून १२ गुण मिळवले आहेत. त्यांनी आणखी एकच सामना जिंकला तर त्यांचे गुण १४ होतील. आणि सरस धावगतीच्या आधारे बाद फेरीत जाण्याच्या बंगळुरूच्या शक्यता वाढतील. (IPL 2024 RCB)
RCB MOVES TO NO.7 POSITION IN THE TABLE OF THIS IPL 2024…!!!!! 🔥 pic.twitter.com/b26ZZU372c
— Tanuj Singh (@ImTanujSingh) May 4, 2024
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : महिला आणि पुरुषांचा रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र)
तिसरी शक्यता – बंगळुरूसाठी आणखी एक गोष्ट जुळून यावी लागेल. ती म्हणजे चेन्नई आणि दिल्ली कॅपिटल्स या इतर दोन संघांनीही उर्वरित सामन्यांपैकी दोनपेक्षा जास्त विजय मिळवता कामा नयेत. चेन्नई संघाचे १२ आणि दिल्ली संघाचे १० गुण आहेत. चेन्नईने आणखी एक आणि दिल्लीने दोन सामने जिंकले तर दोघांचे १४ गुण होतील. आणि बंगळुरुची गाडी अडखळेल. (IPL 2024 RCB)
चौथी शक्यता – पंजाब किंग्ज हा संघही पहिल्या चारात पोहोचण्याच्या प्रयत्नांत आहे. आणि त्यांचेही बंगळुरू प्रमाणेच ८ गुण आहेत. त्यांनी उर्वरित सगळे सामने जिंकले, तरी ते बंगळुरूसमोर आव्हान उभं करतील. आणि वर म्हटल्याप्रमाणे, या इतर निकालांपूर्वी आधी बंगळुरू संघाने आपले उर्वरित तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकणं आवश्यक आहे. (IPL 2024 RCB)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community