Bajrang Punia Suspension : बजरंग पुनियाने खरंच उत्तेजक द्रव्य चाचणी दिली नाही?

Bajrang Punia Suspension : उत्तेजक द्रव्य चाचणी न दिल्यामुळे बजरंगला नाडाने तात्पुरतं निलंबित केलं आहे.

129
Bajrang Punia : बजरंग पुनियावरील बंदी नाडाने पुन्हा केली लागू
  • ऋजुता लुकतुके

माजी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाला (Bajrang Punia) अखेर नाडा म्हणजेच राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यसेवन विरोधी संघटननेनं तात्पुरतं निलंबित केलं आहे. यावर्षी मार्च महिन्यात सोनपत इथं झालेल्या शिबिरादरम्यान नाडाच्या अधिकाऱ्यांना लघवीचा नमुना देण्यास बजरंगने नकार दिला होता. त्यानंतर नाडाने २३ एप्रिलला एक पत्रक काढून बजरंगवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई झाल्याचं स्पष्ट केलं होतं. ‘नाडा कायदा २०२१ नुसार, उत्तेजक चाचणीत अडथळा आणण्याच्या आरोपावरून याप्रकरणी निकाल येईपर्यंत बजरंगला कुठल्याही स्वरुपाच्या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही,’ असं या निकालात म्हटलं आहे. (Bajrang Punia Suspension)

ही बातमी आता अचानक समोर आली आहे आणि लागलीच बजरंग पुनियाने स्पष्टीकरण देताना आपण नाडा अधिकाऱ्यांना कधीच लघवीच्या नमुन्यासाठी नकार दिला नसल्याचं म्हटलंय. त्याने या संदर्भात एक ट्विट करून म्हटलंय की, ‘माझ्याबद्दल नाडा अधिकाऱ्यांना सहकार्य न केल्याच्या पसरवलेल्या बातम्या या खोट्या आहेत. मी चाचणीसाठी आलेल्या नाडा (NADA) अधिकाऱ्यांना एक प्रश्न विचारला होता की, चाचणीसाठी आणलेल्या किटची मुदत संपलेली असताना ते का वापरलं जातंय? आणि अशा प्रकरणात ते काय कारवाई करणार? नाडाच्या पत्रकाला माझे वकील उत्तर देणार आहेत?’ (Bajrang Punia Suspension)

Insert tweet – https://twitter.com/BajrangPunia/status/1787017152110657763

(हेही वाचा – IPL 2024 RCB : आताही बंगळुरूला बाद फेरीची आशा आहे का?)

बजरंगच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या स्वप्नाला सुरुंग

नाडाच्या (NADA) अधिकाऱ्याने आपल्या जबानीत वेगळाच आरोप केला आहे. ‘सहकार्य न केल्यास कारवाई होऊ शकते, अशा इशारा दिलेला असताना खेळाडू तिथून उठून निघून गेला. त्याच्याबरोबर त्याचे खूप सारे समर्थक होते आणि तो सातत्याने एकच गोष्ट बोलत होता. शेवटी तो तिथून निघून गेला,’ असं नाडा अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे.  (Bajrang Punia Suspension)

या प्रकरणी पुढील सुनावणी होईलही. पण, त्यामुळे बजरंगच्या (Bajrang Punia) पॅरिस ऑलिम्पिकच्या स्वप्नाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. कारण, तात्पुरती बंदी असताना खेळाडू कुठल्याही पात्रता स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. सध्या बजरंगला ७ मे च्या आत नाडाच्या आरोपांना कायदेशीर उत्तर द्यायचं आहे. (Bajrang Punia Suspension)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.