Pune To Mumbai Train: ‘असा’ करा पुणे ते मुंबई प्रवास

181
pune junction railway station : पुण्यामध्ये एकूण किती रेल्वे स्टेशन्स आहेत?

पुणे ते मुंबई प्रवास (Pune To Mumbai Train) करण्यासाठी खूप सुविधा उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर पसंती ही ट्रेनला आहे. पुणे ते मुंबई दरम्यान दररोज 36 ट्रेन धावतात. मुंबईहून ट्रेनने लागणारा किमान वेळ ३ तास ५५ मि. आहे. सुट्ट्यांमध्ये बरेच प्रवासी पुणे, मुंबई यांसारख्या शहरांमध्ये फिरायला येतात. डेक्कन एक्सप्रेस (11008), सिंहगड एक्स्प्रेस (11010), सीबीई एलटीटी एक्स्प्रेस (11014), कोणार्क एक्सप्रेस (11020), सह्याद्री एक्स्प्रेस (11024) या पुणे ते मुंबई प्रवास करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. (Pune To Mumbai Train)

इंटरसिटी एक्स्प्रेस

इंटरसिटी एक्स्प्रेस (Intercity Express) मुंबईहून (सईएसटी) सकाळी ६.४५ वाजता निघून सकाळी ९.२० वाजता पोहचते. तसेच, नवीन वेळापत्रकानुसार ही गाडी पुण्याहून सायंकाळी ६.३० वाजता मुंबईकडे रवाना होऊन रात्री ९.०५ वाजता मुंबईला पोहचते. जुन्या वेळापत्रकानुसार ही गाडी पुण्याहून सायंकाळी ५.५५ निघून रात्री ९.०५ वाजता मुंबईला पोहोचत होती. (Pune To Mumbai Train)

पुणे ते मुंबई विस्टाडोम डेक्कन एक्सप्रेस

डेक्कन एक्सप्रेस (Deccan Express) ही सीटर ट्रेन आहे आणि तिला एसी आणि नॉन-एसी असे दोन्ही डबे आहेत. डेक्कन एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सकाळी सात वाजता सुटते आणि त्याच दिवशी सकाळी 11.05 वाजता पुण्याला पोहोचते. परतीच्या टप्प्यावर, 01008 डेक्कन एक्सप्रेस पुण्याहून दररोज दुपारी 3.15 वाजता सुटते आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचते. (Pune To Mumbai Train)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.