- वंदना बर्वे
लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा महत्त्वाचा आहे. कारण, या टप्प्यात भाजपाचे लोहपुरूष गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री निवडणुकीच्या मैदानात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील १० मंत्र्याच्या राजकीय भविष्याचा निर्णय या टप्प्यात होणार आहे. (Lok Sabha Election 2024)
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार संपला आहे. ११ राज्यांतील ९३ जागांवर मंगळवार, ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी १३३१ उमेदवार मैदानात उतरले आहेत. या टप्प्यात २० मतदारसंघ असे आहेत ज्यांच्यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. अनेक जागांवर दिग्गजांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. यात १० केंद्रीय मंत्री आणि चार माजी मुख्यमंत्र्यांना अग्निपरिक्षा द्यावी लागणार आहे. (Lok Sabha Election 2024)
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई राधाकृष्ण डोडामणी हे कर्नाटकातील गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. बीएस येडियुरप्पा आणि कल्याण सिंह या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांचे भवितव्य या टप्प्यावर ठरत आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची सून डिंपल यादव त्यांच्या कार्यस्थळ मैनपुरी येथून राजकीय लढाईत आहेत. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Congress कडून जवानांच्या बलिदानाचा अपमान- सिरसा)
२० हायप्रोफाईल जागा
गांधीनगर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने शहा यांच्यासमोर सोनल रमणभाई पटेल यांना तिकीट दिले आहे. मोहम्मद दानिश देसाई बहुजन समाज पक्षाकडून (बसपा) नशीब आजमावत आहेत. या जागेवर आठ अपक्षांसह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. महत्त्वाचे म्हणजे, गुजरातमधील भाजपाच्या नेत्यांनी शहा यांना १० लाख मताच्या फरकाने निवडून आणण्याचा विडा उचलला आहे. (Lok Sabha Election 2024)
गुना
मध्य प्रदेशातील गुना लोकसभा सीटची गणना हाय-प्रोफाइल जागांमध्ये केली जाते. भाजपाने येथून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत याच जागेवरून सिंधिया कॉंग्रेसच्या तिकीटवर निवडणूक लढवित होते आणि भाजपाच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता. बसपकडून धनीराम चौधरी आणि काँग्रेसकडून यादवेंद्र राव देशराज सिंह निवडणूक लढवत आहेत. या जागेसाठी सात अपक्षांसह एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार विनायक राऊत यांच्या विरोधात लढत आहेत. येथे तीन अपक्षांसह नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)
आग्रा
उत्तर प्रदेशातील आग्रा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बसपाने पूजा अमरोही यांना तर समाजवादी पक्षाने (एसपी) सुरेश चंद्र यांना बघेल यांच्या विरोधात उभे केले आहे. आग्रा जागेसाठी तीन अपक्षांसह एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)
उत्तर गोवा
या जागेवर भाजपाकडून केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर बसपाचे मिलन वायंगणकार आणि काँग्रेसचे रमाकांत खलप यांचे आव्हान आहे. तीन अपक्षांसह एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)
राजकोट
केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला गुजरातच्या राजकोटमधून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने धनानी परेश आणि बसपाने चमनभाई नागजीभाई सवसानी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर सहा अपक्षांसह एकूण नऊ उमेदवार उभे आहेत. (Lok Sabha Election 2024)
पोरबंदर
गुजरातमधील पोरबंदर या जागेवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसने ललित वसोया यांना तर बसपाने एनपी राठोड यांना उमेदवारी दिली आहे. सहा अपक्षांसह एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)
खेडा
केंद्रीय मंत्री देवू सिंह चौहान गुजरातच्या खेडा लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने कालू सिंग दाभी यांना उभे केले असून बसपाने भैलालभाई कालूभाई पांडव यांना उमेदवारी दिली आहे. तीन अपक्षांसह एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)
बिदर
कर्नाटकच्या बीदर जागेवर केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्यासमोर काँग्रेसने सागर ईश्वर खद्रे आणि बसपाने पुत्रराज यांना तिकीट दिले आहे. येथे १० अपक्षांसह एकूण १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)
धारवाड
कर्नाटकच्या धारवाड लोकसभा जागेवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांना काँग्रेसचे विनोद आसुती यांचे आव्हान आहे. या जागेवर सहा अपक्षांसह एकूण १७ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राज्यातील ‘या’ पाच लढती; ज्याने मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला)
चार माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीच्या रिंगणात
बेळगाव
कर्नाटकातील बेळगाव मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची दंड थोपटले आहेत. ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने त्यांच्याविरुद्ध मृणाल आर. हेब्बाळकर आणि बसपाने अशोक अप्पाया अप्पुगोळ यांना उमेदवारी दिली आहे. सात अपक्षांसह एकूण १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. (Lok Sabha Election 2024)
हावेरी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई भाजपाच्या तिकीटावर नशीब आजमावत आहेत. काँग्रेसने याठिकाणी आनंदस्वामी गड्डादेवमठ यांना उमेदवारी दिली आहे. पाच अपक्षांसह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)
विदिशा
माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना काँग्रेसचे प्रतापभानू शर्मा आणि बसपाचे किशाल लाल यांचे आव्हान आहे. विदिशामध्ये चार अपक्षांसह एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)
राजगड
माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह ३३ वर्षांनंतर मध्य प्रदेशातील राजगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजपाने रोडमल नागर तर बसपाने डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांना दिग्विजय सिंह यांच्या विरोधात उमेदवार म्हणून घोषित केले आहे. सहा अपक्षांसह एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. रोडमल नागर हे देखील विद्यमान खासदार आहेत. (Lok Sabha Election 2024)
गुलबर्गा
कर्नाटकातील गुलबर्गा ही जागा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनली आहे. खरगे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी हे काँग्रेसच्या तिकीटावर येथून निवडणूक लढवत आहेत. भाजपाने डॉ. उमेश जाधव यांना तिकीट दिले आहे. बसपाने हुचेश्वरा वाठार गौर यांना उमेदवारी दिली आहे. सहा अपक्षांसह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)
बारामती
महाराष्ट्राच्या बारामती लोकसभा जागेवर यावेळी रंजक लढत होत आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात आहेत, तर त्यांची नणंद आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) तिकिटावर मैदानात उतरल्या आहेत. (Lok Sabha Election 2024)
मैनपुरी
मैनपुरी म्हणजे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांची कर्मभूमि. आता त्यांची सून आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव येथून नशीब आजमावत आहेत. भाजपाने जयवीर सिंग यांना उमेदवारी दिली आहे. तर बसपाने शिवप्रसाद यादव यांना उमेदवारी दिली आहे. येथे दोन अपक्षांसह आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)
एटा
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंह राजू भैया पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील एटा लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. येथे सपाकडून देवेंद्र शाक्य आणि बसपाकडून मोहम्मद इरफान निवडणूक लढवत आहेत. चार अपक्षांसह एकूण १० उमेदवार उभे आहेत. (Lok Sabha Election 2024)
शिमोगा
राज्याचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र हे कर्नाटकातील शिमोगा लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने गीता शिवराजकुमार यांना तर बसपाने एडी शिवप्पा यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी १७ अपक्षांसह एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)
कोरबा
छत्तीसगडमधील कोरबा लोकसभा सीटही हाय-प्रोफाइल आहे. येथे माजी केंद्रीय मंत्री चरणदास महंत यांच्या पत्नी आणि विद्यमान खासदार ज्योत्स्ना चरण महंत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर भाजपाने सरोज पांडे यांना तिकीट दिले आहे. बसपाकडून दुजराज बुध मैदानात आहेत. या जागेवर १८ अपक्षांसह एकूण २७ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community