Congress सत्तेवर आल्यास राम मंदिराचा निर्णय बदलणार; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा खळबळजनक दावा

काँग्रेसचे सरकार आल्यानंतर आपण एक महाशक्ती आयोगाची स्थापना  करणार आणि राम मंदिराचा निर्णय अगदी तसाच बदलणार, ज्या पद्धतीने राजीव गांधी यांनी शाह बानोचा निर्णय बदलला होता.

201

काँग्रेस (Congress) पुन्हा सत्तेवर आली तर, राम मंदिराचा निर्णय बदलण्याच्या तयारीत आहे. शाह बानो प्रकरणाप्रमाणे निर्णय बदलणार, असा खळबळजनक दावा आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. मागील तीन दशके आचार्य कृष्णम हे काँग्रेसमध्ये कार्यरत होते. मागील वर्षी त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

मी 32 वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्षात होतो. जेव्हा राम मंदिराचा निर्णय आला, तेव्हा काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधींनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत, ते म्हणाले, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर आपण एक महाशक्ती आयोगाची स्थापना  करणार आणि राम मंदिराचा निर्णय अगदी तसाच बदलणार, ज्या पद्धतीने राजीव गांधी यांनी शाह बानोचा निर्णय बदलला होता.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : राज्यातील ‘या’ पाच लढती; ज्याने मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला)

कसा बदलला होता शाह बानो प्रकरणाचा निर्णय? 

62 वर्षीय मुस्लीम महिला शाह बानो हीने पतीकडून तीन तलाक मिळाल्यानंतर एप्रिल 1978 मध्ये उदरनिर्वाह भत्ता मिळावा यासाठी एक याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीनंतर, उच्च न्यायालयाने शाह बानोच्या बाजूने निर्णय दिला होता. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला होता. यानंतर तत्कालीन राजीव गांधी सरकारने मे 1986 मध्ये मुस्लीम महिला (घटस्फोटासंदर्भात अधिकारांचे संरक्षण) कायदा संमत केला. हा कायदा संमत झाल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात आला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.