Lok Sabha Election 2024 : महायुती राज्यात किती जागा जिंकणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा

विरोधी नेत्यांना ऐकण्यास लोकही उत्सुक नाहीत. आम्हाला यशाचा आत्मविश्वास आहेच. मागील निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदीच्या जेवढ्या सभा झाल्या तेवढ्याच यंदाही होत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

289

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महायुतीला किती जागा मिळतील, याबाबत सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून दावे केले जात आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच महायुती किती जागा जिंकणार याचा आकडा सांगितला आहे. जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे. मोदींचा १० वर्षांत रेकॉर्ड बघितल्यानंतर २०१९ मधील जागा तर आम्ही राखू. त्यापेक्षा अधिक म्हणजे ४० पेक्षा जास्त जागा नक्कीच जिंकू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोदींना ऐकण्यास लोक उत्सुक 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक भाजपा नेते, मंत्री महाराष्ट्रात प्रचारासाठी येत आहे. प्रचारसभा, मेळावे घेताना पाहायला मिळत आहे. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी नेत्यांना ऐकण्यास लोकही उत्सुक नाहीत. आम्हाला यशाचा आत्मविश्वास आहेच. मागील निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदीच्या जेवढ्या सभा झाल्या तेवढ्याच यंदाही होत आहेत. एखाद-दुसरी जास्त असेल. फरक एवढाच की पूर्वी मोदी दिवसाला एक-दोन सभा करायचे, यंदा तीन-तीन सभा झाल्या आहेत. आमच्या नेत्याला ऐकण्यास लोक उत्सुक आहेत. त्यामुळे गर्दी होते, मग मोदींना का बोलावू नये, असा सवाल करत, विरोधकांकडे गर्दी जमत नाही. त्यांच्या नेत्यांना ऐकण्यास लोकही उत्सुक नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : राज्यातील ‘या’ पाच लढती; ज्याने मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला)

पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या विधानावरूनही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यावर पुन्हा आमची जवळीक निर्माण होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही, असे फडणवीस म्हणाले. (Lok Sabha Election 2024)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.