राजन विचारे आनंद दिघेंचे नकली शिष्य ; CM Eknath Shinde यांचा राजन विचारेंवर हल्लाबोल 

272
राजन विचारे आनंद दिघेंचे नकली शिष्य ; CM Eknath Shinde राजन विचारेंवर हल्लाबोल 

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू असून, सत्ताधारी व विरोधक यांच्यात खटके उडताना दिसत आहेत. अशातच ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा प्रसार करणारे आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित दोन वर्षांपूर्वी धर्मवीर (Dharmaveer Flim) हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात आनंद दिघे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare) खास शिष्य म्हणून दाखवण्यात आले होते. तसेच या चित्रपटाचा भाग २ ही तयार करण्यात येत आहे, तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक मोठं विधान केलं आहे. या चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेले दृश्य खोटे असून, राजन विचारे हे आनंद दिघे यांचे नकली शिष्य आहेत. धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या (Dharmaveer Part 2) भागाद्वारे आम्ही त्यांचं खरं रूप सर्वांसमोर आणू असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (CM Eknath Shinde)

(हेही – Congress सत्तेवर आल्यास राम मंदिराचा निर्णय बदलणार; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा खळबळजनक दावा)

एकनाथ शिंदे म्हणाले की, धर्मवीर चित्रपटात दाखवलेले राजन विचारेंबाबतचे सर्व दृश्य हे खोटे आहेत. आनंद दिघे यांचे खास शिष्य म्हणून राजन विचारे यांना दाखवण्यात आले होते. संबंधित चित्रपटात राजन विचारे हे नकली आहेत. असे गंभीर विधान एकनाथ शिंदे यांनी केले. चित्रपटात दाखवलेल्या दृश्यांमद्धे राजन विचारे यांना आनंद दिघे यांनी सभागृहाच्या नेते पदाचा राजीनामा (Resignation Leader of the House) दे आणि राजन राजीनामा देतात असे दृश्य आहे. हे सर्व खोटं आहे. असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यावेळी खरं काय घडलं होतं ते आम्ही धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दाखवणार आहोत. खरंतर आनंद दिघे यांनी राजन विचारे यांना राजीनामा द्यायला सांगितलं होता. मात्र त्यांनी राजीनामा दिला नाही. ते राजीनामा द्यायला टाळाटाळ करत होते.  (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राज्यातील ‘या’ पाच लढती; ज्याने मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला)

पुढे राजन विचारे रघुनाथ मोरे (Raghunaath More) यांच्या कडे गेले. आणि म्हणाले, हे काय चालू आहे? माझं पद काढून घेतायत. मोरे साहेब खूप समजुतदार होते. ते म्हणाले की दिघेंनी काही निर्णय घेतला असेल तर तो जाणीवपूर्वक घेतला असेल. तू बिलकुल इथे तिथे काही बोलू नकोस. असं दिघे साहेबांना विचारे बोलले. मला पद नकोच होतं. तेव्हा साहेबांनी त्याला बोलावलं आणि त्यांच्या भाषेत आनंदाश्रमामधील आतल्या खोलीमध्ये समजावलं. आम्ही सिनेमात जे दाखवलं ते एवढं उलटं आणि एकदम चांगलं दाखवलं. पण तो चांगला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे विधान करत मोठा गौप्यस्फोट केला. (CM Eknath Shinde)      

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.