- ऋजुता लुकतुके
जगभरात सोन्याच्या किमती चढ्या असल्यामुळे सुवर्ण कर्ज (Gold Loans) घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भारतात तर हे प्रमाण मागच्या वर्षभरातच १५ टक्क्यांनी वाढल्याचं दिसतंय. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, २२ मार्च २०२४ पर्यंत देशात १.०३ लाख कोटी रुपयांचं सुवर्ण कर्ज वितरित झालेलं आहे. हे प्रमाणेही गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळ जवळ १५ टक्क्यांनी जास्त आहे. (Gold Loans)
तारण मूल्य वाढलं
सुवर्ण कर्ज (Gold Loans) हे बँकांसाठी सुरक्षित कर्ज मानलं जातं. कारण, ग्राहक सोन्याचे दागिने किंवा सोनं तारण म्हणून ठेवणार असतो. त्यातच सोन्याच्या किमती वाढत असल्यामुळे कर्जाचं तारण मूल्य अलीकडे वाढलं आहे. आणि त्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या कर्जाच्या रकमेतही वाढ झाली आहे. अर्थात, ग्राहकांनी आपल्या लोन-टू-व्हॅल्यू गुणोत्तराचा अभ्यास करणंही आवश्यक असल्याचा सल्ला अशावेळी तज्ज देत असतात. म्हणजे कर्जाची रक्कम जास्त मिळणार असली तरी तुमचं सोनं तारण म्हणून राहणार असतं. आणि त्यातून कर्जाचं मूल्य कमीच होत असतं. (Gold Loans)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात १० केंद्रीय मंत्री आणि चार माजी मुख्यमंत्र्यांची अग्निपरीक्षा)
वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत कमी व्याजदर
बँकांबरोबर कर्जाचा दर ठरवताना ग्राहकाला सुवर्ण कर्ज (Gold Loans) स्वस्त दरात मिळत आहे. कारण, त्याचं तारण मूल्य वाढलेलं असेल तर अधिक कर्ज आणि ते ही स्वस्त दरात असं ग्राहकांचं गणित आहे. तर काही ग्राहक सोन्याचे दर वर-खाली होत असल्यामुळे इतर कर्जांच्या तुलनेत सुवर्ण कर्जाला पसंती देत आहेत. (Gold Loans)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community