मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मागील काही दिवसांपासून १,४००च्या आसपास असतानाच आता हा रुग्णांचा आकडा हजारांचा आसपास आला आहे. रविवारी जिथे १,४३१ रुग्ण आढळून आले होते, तिथे सोमवारी १,०५७ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
४८ रुग्णांचा मृत्यू झाला!
रविवारी जिथे दिवसभरात १,४३१ रुग्ण आढळून आले होते, तिथे सोमवारी १,०५७ रुग्ण आढळून आले आहेत. तर सोमवारी दिवसभरात १ हजार ३१२ रुग्ण बरे होवून घरी परतले. सोमवारपर्यंत संपूर्ण मुंबईत २८ हजार ०८६ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू होता. सोमवारी दिवसभरात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू पावलेल्या रूग्णांमध्ये २६ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. तर यामध्ये २८ पुरुष आणि २० महिला रुग्णांचा समावेश होता. तर चाळीशीच्या आतील ०३ रुग्णांचा समावेश आहे. तर ६० वर्षांवरील २६ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या १९ एवढी होती.
(हेही वाचा : ‘टूलकिट’वर भाजपचे ट्विट! ट्विटरची ‘शेरेबाजी’! पोलिसांची नोटीस!)
रुग्ण दुपटीचा दर हा ३३४ दिवसांवर!
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९३ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ३३४ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत २०८ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या ही ४४ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community