Monkey : गुहागर तालुक्यात माकडांचा उच्छाद; पाभरे गावातील घर, फळबागांचे नुकसान

गुहागर (पाभरे गाव) बामणे वाडीत माकडांचा त्रास खूपच वाढलेला आहे. ही माकडे बगीचातील फुले, फळे यांचे नुकसान करत आहेतच, तसेच घरांवरील कौले, कोणे, सिमेंटचे सीट सुद्धा तोडत आहेत.

1039

कोकणात वन्यप्राण्यांचा त्रास ही नेहमीची गोष्ट बनली आहे. सध्या इथे माकडांनी (Monkey) उच्छाद मांडला आहे. यामुळे फळ बागांसह घरांचेही नुकसान होत असते. कोकणाला भेडसावणाऱ्या या समस्येवर थेट विधानसभेतही चर्चा झाली, पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कोकणवासीयांसाठी आता ही समस्या त्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम करू लागली आहे.

konkan1

९० टक्के शेतकऱ्यांनी शेती करणे सोडले  

गुहागर तालुक्यात माकडे (Monkey) आणि रानडुक्कर यांचा होणाऱ्या त्रासामुळे तालुक्यातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी शेती करण्याचे सोडून दिले आहे. अति प्रतिकूल परिस्थितीत निवडक शेतकरी शेती करीत आहेत. त्यामुळे गावात अजून तरी हिरवळ पहायला मिळत आहे. मात्र आता लोकांनी शेती करणे सोडली आहे. शेतकऱ्यांना होणाऱ्या या माकडाच्या त्रासापासून सुटका व्हावी याकरिता वन विभागाने उपाययोजना करणे काळाची गरज आहे. आंबा, फणस, नारळ, सुपारी, नाचणी, भात शेती, पालेभाज्या आदी भागात शेतकरी व बचत गटाच्या माध्यमातून उन्हाळी व पावसाळी मोठ्या प्रमाणात शेती पिकवली जाते परंतु माकडाच्या (Monkey) व रानडुक्करांच्या वाढत्या संख्येमुळे शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : महायुती राज्यात किती जागा जिंकणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा)

पाभरे गावात घरांचे नुकसान 

गुहागर (पाभरे गाव) बामणे वाडीत माकडांचा (Monkey) त्रास खूपच वाढलेला आहे. ही माकडे बगीचातील फुले, फळे यांचे नुकसान करत आहेतच, तसेच घरांवरील कौले, कोणे, सिमेंट सीट सुद्धा तोडत आहेत. येथील रहिवाशी घराशेजारी शेती, फळ लागवड काहीच करू शकत नाही. माकडांना मारायचा प्रयत्न केल्यास ती थेट अंगावर येतात. ही समस्या सततची आहे. हा विषय विधानसभेत आमदार भास्कर जाधव यांनी मांडला होता, पण तरीही यावर काहीच निर्णय आलेला नाही. या समस्येवर कायमस्वरुपी तोड‌गा काढण्यात यावा, अशी मागणी पाभरे गावाचे ग्रामस्थ गणपत बाळू बामणे यांनी केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.