ओडिशातील बेहरामपूर (Behrampur in Odisha) येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजपा जे काही म्हणेल ते करते, येथे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही आमच्या सर्व घोषणा पूर्ण ताकदीने लागू करू. यावेळी ओडिशात एकाच वेळी दोन यज्ञ होत आहेत. एक यज्ञ म्हणजे देशात, हिंदुस्थानात मजबूत सरकार स्थापन करणे. आणि दुसरा यज्ञ म्हणजे ओडिशामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली एक मजबूत राज्य सरकार स्थापन करण्यासाठी, तसेच ओडीशामध्ये येत्या १३ मे रोजी येथे मतदान होणार आहे. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – Lok Sabha Eelction 2024 : पावसात भिजून किंवा रडून निवडणूक जिंकता येत नाही ; भाजपा नेत्याचा शरद पवारांसह रोहित पवारांवर निशाणा )
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आज मी ओडिशातील भाजपाचे (BJP Odisha) खूप खूप अभिनंदन करतो. ओडिशाच्या आकांक्षा येथील तरुणांची स्वप्ने आणि मुलींची क्षमता लक्षात घेऊन, ओडिशा भाजपाने खूप काम केले आहे. आधी काँग्रेसने लुटले आणि नंतर बीजेडीने (BJD) लूट केली… पण आता असे होणार नाही. अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
(हेही वाचा – काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य; CM Eknath Shinde यांची टीका)
बीजेडी सरकारची मुदत संपण्याची तारीख…
सध्याच्या बीजेडी सरकारवर हल्लाबोल करताना भाजपाने म्हटले आहे की, येथील बीजू जनता दल (BJD) सरकारची ४ जूनला मुदत संपणार आहे. बीजद अध्यक्ष तथा मुख्यमंत्री नवीन पटनायक (CM Naveen Patnaik) यांच्यावर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, राज्याला ओडिया भाषा आणि संस्कृती समजणाऱ्या मुख्यमंत्र्याची आवश्यकता आहे. निवडणुकीनंतर भाजपा येथे डबल इंजिन सरकार बनवणार आम्ही ओडिशाला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवणार, तसेच महत्वाचे म्हणजे, संसदेमध्ये (Parliament) एखादे बिल पास करताना मोदी सरकारला जेव्हा-जेव्हा अडचण आली, तेव्हा-तेव्हा बीजू जनता दलाच्या खासदारांनी एनडीएमध्ये नसतानाही मोदी सरकारला साथ दिली. (PM Narendra Modi)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community