उटीचा फ्लॉवर फेस्टीव्हल; पहा हे सुंदर  फोटो

१८९६ पासून होतोय फ्लॉवर फेस्टीव्हल :  उटीचा फ्लॉवर फेस्टिव्हल आजपासून नाही तर १८९६ सालापासून साजरा केला जातो. दरवर्षी या महोत्सवात १५० हून अधिक फुलांच्या विविध प्रजातींचे प्रदर्शन पाहण्यासाठी लोक येतात.

यावर्षी देखील बोटॅनिकल गार्डनमध्ये उटी फ्लॉवर फेस्टिव्हल २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे आयोजन केलेल्या बागेच्या अगदी मध्यभागी, फुलांच्या विविध प्रजातींच्या सुमारे १५०० कुंड्या सजवल्या जातात.

कडाक्याचे ऊन असले तरी शाळांना सुट्टी असते म्हणून अनेक ट्रिप प्लॅन केले जातात. तुम्हीही यंदाच्या सुट्टीत काहीतरी वेगळं शोधत असाल तर उटी (Ooty) बेस्ट आहे.

उटीला तुम्ही याआधीही जाऊन आला असाल. तर, यंदाच्या उन्हाळ्यात काहीतरी स्पेशल आहे. कारण, उटीतील प्रसिद्ध फ्लॉवर फेस्टीव्हल यंदाच्या उन्हाळ्यात होणार आहे. या फेस्टला देशभरातील पर्यटक भेट देतात. तसेच, अनेक विदेशी पर्यटकही इथे हजेरी लावतात. 

फोटोग्राफी प्रेमींसाठी हा फ्लॉवर फेस्ट विशेषतः सुवर्ण संधी आहे. कारण, या आश्चर्यचकीत करणाऱ्या फुलांचे फोटो काढण्यासाठी लाखो लोक इथे भेट देतात.

फ्लॉवर फेस्टिव्हल पाहण्यासाठी : फ्लॉवर फेस्टीव्हलला भेट देण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकींग करता येईल. या तिकीट काउंटरवरून ऑफलाइनही तिकीट खरेदी करता येणार आहे. फ्लॉवर फेस्टिव्हलसाठी प्रौढांकरता तिकिटाची किंमत ५० रुपये आहे. तर, लहान मुलांसाठी तिकीट 30 रुपये आहे. तिकीट खरेदी करून प्रेक्षक दिवसभर महोत्सवाचा आनंद घेऊ शकतात.

उत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते, ज्यात संगीत आणि नृत्याचा समावेश होतो.

किती दिवस असतो हा फेस्टीव्हल? :  उटी फ्लॉवर फेस्टिव्हल २०२४ हा ६ दिवस चालणार आहे. १७ मे रोजी सुरू होईल आणि २२ मे रोजी संपेल. येथे सजवलेली फुले पाहण्यासोबतच त्यांची सविस्तर माहितीही पर्यटकांना मिळणार आहे.