CBI चे डीएसपी सायबर टोळीच्या जाळ्यात, २ लाख गमावले

केंद्रीय तपास यंत्रणेतील पोलिस उपधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची याप्रकारे फसवणूक झाल्यामुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

202
CBI चे डीएसपी सायबर टोळीच्या जाळ्यात, २ लाख गमावले

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) पोलिस उपअधीक्षक (DSP) दर्जाच्या अधिकाऱ्यांना सायबर गुन्हेगारी टोळीने आपले सावज बनवून त्यांच्याकडून ऑनलाइन २ लाख रुपये उकळल्याची घटना मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे उघडकीस आली आहे. सायबर गुन्हेगाराच्या टोळीने दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून अमली पदार्थ आणि अनधिकृतचे पार्सल (Drugs Parcel) दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) पकडण्यात आले असून त्यात तुमचे आधारकार्ड, व कागदपत्रे मिळून आल्याचा दावा करून सीबीआयचे डीएसपी (CBI DSP) यांच्याकडून २ लाख रुपये ऑनलाईन उकळण्यात आले. या प्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात (BKC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेतील पोलिस उपधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची याप्रकारे फसवणूक झाल्यामुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. (CBI)

तक्रारदार हे केंद्रीय अन्वेषण विभागा (CBI) च्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयाशी संलग्न आहे. पोलीस उपधीक्षक (DSP) या दर्जावर असलेल्या अधिकाऱ्यांना २६ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचमधून (Delhi Crime Branch) ‘आशिष शर्मा’ नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. शर्मा याने दावा केला की ८ पासपोर्ट, ५ क्रेडिट कार्ड, १७० ग्रॅम मेफेड्रोन (MD) आणि ४५ हजार रुपयांची रोकड असलेली अधिकाऱ्यांचे नाव असलेले एक पार्सल २३ एप्रिल रोजी कंबोडिया (Cambodia) येथून दिल्ली विमानतळावर आले होते. सीबीआय अधिकाऱ्यांनी ते पार्सल त्याचे नसल्याचे सांगितले, त्याच दिवशी त्याला ‘हॅलो दिल्ली क्राइम ब्रँच’ म्हणून नोंदणीकृत व्हॉट्सॲप क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. ४९ मिनिटे चाललेल्या कॉल दरम्यान, कॉलरने पोलिसांचा गणवेश घातला होता आणि त्याच्या बाजूला दिल्ली पोलिसांचा लोगो लावला होता. तो म्हणाला की, अधिकाऱ्याने त्याचा आधार तपशील एखाद्याशी शेअर केला असेल ज्याने त्याचा गैरवापर केला असेल आणि त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली जाईल. (CBI)

(हेही वाचा – मुंबईत जाणीवपूर्वक मराठी-गुजराती वाद निर्माण केला जातोय; MNS चा आरोप)

व्हॉट्सॲप कॉल दरम्यान कॉल करणाऱ्या व्यक्तीने सीबीआय (CBI) अधिकाऱ्याचे ओळखपत्र आणि आधार कार्ड तपासले. त्याने अधिकाऱ्याला दिल्ली पोलिसांची कथित नोटीसही पाठवली. त्यानंतरच्या कॉल दरम्यान, त्याने अधिकाऱ्याला सांगितले की आरबीआय कडे पडताळणी आवश्यक असलेल्या प्रक्रियेसाठी त्याला सव्वा तीन लाख भरावे लागतील. पडताळणीनंतर पैसे त्याला परत केले जातील, असे सीबीआय अधिकारी यांना कॉल करणाऱ्या बोगस पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ३० एप्रिल रोजी सीबीआय अधिकाऱ्याला आरोपीचा दुसरा कॉल आला यावेळी, त्यांनी त्याला पडताळणीसाठी २ लाख भरण्यास सांगितले, सीबीआय अधिकाऱ्यांनी तात्काळ २ लाख रुपयांची ऑनलाईन पाठवले. पडताळणी झाली की नाही आणि त्याचे पैसे कधी परत मिळतील हे खात्री करण्यासाठी त्याने दोन दिवसांनी आलेल्या कॉलवर फोन केला. आरोपीने त्याला सांगितले की ज्या व्यक्तीने त्याच्या आधारचा गैरवापर केला त्याला अटक करण्यात आली आहे आणि कॉल डिस्कनेक्ट केला आहे. या अधिकाऱ्याने ४ मे रोजी आपल्या सहकाऱ्याशी या घटनेबाबत चर्चा केली आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यानंतर सीबीआय अधिकाऱ्याने बीकेसी पोलीस ठाण्यात संपर्क साधला, त्याच्या तक्रारीच्या आधारे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, असे बीकेसी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ कदम यांनी सांगितले. (CBI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.