काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या राधिका खेरा यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. त्याविषयी हायकमांडला सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोप केला. मी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊन आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी माझा छळ सुरू केला, असेही त्या म्हणाल्या. खेरा यांच्या या आरोपानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या डीएनएमध्येच रामद्रोह आहे, असे ते म्हणाले.
(हेही वाचा AAP ने खलिस्तानींकडून कोट्यवधी रुपये घेतल्याच्या आरोपाची NIA मार्फत होणार चौकशी)
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
उत्तर प्रदेशातील एका सभेत बोलताना योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी खेरा यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसवर टीका केली. राधिका खेरा या अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आल्या आणि त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. यावरून काँग्रेस नेत्यांच्या मनात प्रभू रामाविषयी असलेला द्वेष दिसून येतो. खरं तर काँग्रेस असेल किंवा त्यांचे मित्र पक्ष असतील, यांच्या एनडीएमध्ये रामद्रोह आहे. ज्या लोकांच्या डीएनएमध्ये रामद्रोह आहे. देशातील जनता त्यांना कधीही मतदान करणार नाही, असे ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community