एअर इंडियाच्या विमानातून सामान्य श्रेणीच्या तिकिटाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यापुढे केवळ १५ किलो सामान सोबत नेता येणार आहे. त्यावर जर सामानाचे वजन असेल, तर त्याकरिता अतिरिक्त शुल्क भरावे लागले. यापूर्वी ही मर्यादा २५ किलो इतकी होती. त्यात १० किलोंनी कपात केली आहे. (Air India)
एअर इंडिया कंपनीची खरेदी टाटा समुहाने केल्यानंतर आता कंपनीच्या कामकाजात अनेक बदल करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीने विमान सेवा चालविल्या जातात, त्याआधारे कंपनीने आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. (Air India)
(हेही वाचा – Sunita Williams 3rd Mission: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित, अमेरिकेची अवकाश संस्था नासाने सांगितले कारण ? जाणून घ्या )
२५ किलो सामान केव्हा नेता येईल?
कंपनीने कम्पर्ट, कम्फर्ट प्लस आणि फ्रेक्स अशा तीन श्रेणी प्रवाशांकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत. या श्रेणीअंतर्गत तिकीट बुकिंग केले, तर विविध सुविधा दिल्या आहेत. कम्फर्ट आणि कम्फर्ट प्लस या श्रेणीअंतर्गत तिकिटांचे बुकिंग केल्यास २५ किलो सामान प्रवाशास सोबत बाळगता येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community