Helicopters in Election Campaigns : निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टरवर राजकीय पक्ष किती पैसे खर्च करतात माहीत आहे?

निवडणुकीच्या काळात हेलिकॉप्टरची मागणी ४० टक्क्यांनी वाढली आहे

212
Helicopters in Election Campaigns : निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टरवर राजकीय पक्ष किती पैसे खर्च करतात माहीत आहे?
Helicopters in Election Campaigns : निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टरवर राजकीय पक्ष किती पैसे खर्च करतात माहीत आहे?
  • ऋजुता लुकतुके

भारत हा सगळ्यात मोठा लोकशाही देश तर आहेच. पण, देशात एका अब्जाहून जास्त लोक मतदान करतात ही आकडेवारी बघितली की, आपल्या निवडणुकीची व्याप्ती लक्षात येते. अशावेळी निवडणुकीची उमेदवारी जाहीर होऊन अर्ज भरल्यानंतर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत नेत्यांची काय धावपळ होत असेल ते वेगळं सांगायला नको. एकेकाळी रस्त्या रस्त्यांवर रिक्षा फिरवल्या जायच्या. पक्षाच्या नावांच्या घोषणा असायच्या. नेते पत्रकं काढायचे. म्हणजे सगळा मामला रिक्षा, गाड्या आणि ध्वनीवर्धक यंत्रांचा होता. (Helicopters in Election Campaigns)

पण, आता रस्त्यांवरील गाड्यांची जागा चक्क गेलिकॉप्टरनी घेतली आहे. अधिकृत ताजी आकडेवारीच असं सांगते की, निवडणुकीच्या वेळी नेहमीपेक्षा हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड विमानांचा वापर ४० टक्क्यांनी जास्त होतो. ही आकडेवारी बघून अखेर निवडणूक आयोगानेही पक्षांना हेलिकॉप्टरवर (Helicopters in Election Campaigns) केलेला खर्च उघड करण्याचे आदेश एप्रिल २०२४ मध्ये दिले आहेत. पक्षांक़डून ती आकडेवारी जाहीर होईलही. पण, तोपर्यंत आपण हेलिकॉप्टरचं प्रचारातील स्थान आणि आर्थिक गणित काय आहे ते समजून घेऊया.

(हेही वाचा – Air India: एअर इंडियाने ‘बॅगेज पॉलिसी’ बदलली, किती किलो सामान वाहून नेण्याची परवानगी ?)

हेलिकॉप्टरच्या वापराला प्रचारात गती कधी मिळाली, याचं समर्पक उत्तर प्रचाराचं लॉजिस्टिक्स सांभाळणाऱ्या कंपनीचे संचालक मंदार भारदे यांनी सांगितलं. ‘हेलिकॉप्टरमुळे प्रचाराला गती मिळाली, असं म्हणावं लागेल. भारतीय मतदार जागरुक झाला आहे. आणि उमेदवारांना आपला मतदारसंघ पिंजून काढायचा असतो. त्यातच उमेदवारी जाहीर होऊन अर्ज भरेपर्यंत आणि तिथून प्रचार सुरू करेपर्यंतचा कालावधीही आता दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. अशावेळी कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आकाशातून जातो, हे पक्षांच्या लक्षात आलं. आणि तिथून हेलिकॉप्टरची मागणी वाढत गेली. साधारण २००९ च्या निवडणुकीपासून हे प्रमाण लक्षणीय झालं आहे,’ असं भारदे यांचं म्हणणं आहे.’

हेलिकॉप्टर्समुळे एकाच दिवशी २ ते ३ सभा प्रसंगी ४ सभाही शक्य होतात. त्यामुळे नेत्यांची हेलिकॉप्टरना पसंती असल्याचं ते सांगतात.

(हेही वाचा – IPL 2024, MI bt SRH : सूर्यकुमार नावाच्या वादळाने हैद्राबादला हादरवलं)

हेलिकॉप्टरसाठी खर्च किती येतो?

हेलिकॉप्टर चार्टर्ड विमानांचा पर्याय चांगला असला तरी भारतात नेमकी किती हेलिकॉप्टर उपलब्ध आहेत? आणि यातील किती प्रचारासाठी वापरली जातात हे जाणून घेणंही औत्सुक्याचं ठरेल. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२३ पर्यंत भारतात हेलिकॉप्टर, चार्टर्ड विमानं आणि एअरक्राफ्ट यांची वाहतूक करणाऱ्या ११२ कंपन्या अस्तित्वात आहेत. या सगळ्यांकडे मिळून ४०० एअरक्राफ्ट, १९० हेलिकॉप्टर आणि १७५ विमानं आहेत. उपलब्ध असलेल्या १९० हेलिकॉप्टर्स पैकी ५० टक्क्यांच्या वर हेलिकॉप्टर्स ही समुद्रात फिरतात. तर उर्वरित २५ टक्के हेलिकॉप्टर कॉर्पोरेट आणि खाजगी वापरासाठी वापरली जातात. त्याशिवाय काहींची दुरुस्ती आणि देखभाल बाकी असते. हे सगळं वगळून एकूण ३० ते ३५ हेलिकॉप्टरच निवडणूक प्रचारासाठी (Helicopters in Election Campaigns) वापरता येतात, असं एअरवन विमान क्लबचे अधिकारी राजन मेहरा यांनी सांगितलं.

हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वापर हा उत्तर भारतात होतो, असंही त्यांनी सांगितलं.

हेलिकॉप्टर वापराचा नेमका खर्च मात्र अधिकृतपणे कुणी सांगत नाही. पण, प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात तो १.५ ते २.५ लाख प्रती तास इतका होता, असं काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. यंदा ७ टप्प्यांत मतदान होणार असल्यामुळे पुढील प्रत्येक टप्प्यात हा दर आणि खर्च वाढतच जाईल. आणि मागणीनुसार हा दर चढा राहील, असा अंदाजही या क्षेत्राशी संबंधित लोकांनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – CBI चे डीएसपी सायबर टोळीच्या जाळ्यात, २ लाख गमावले)

कुठला पक्ष वापरतो सर्वाधिक हेलिकॉप्टर्स?

या जानेवारी महिन्यातच राजकीय पक्षांनी सादर केलेलं खर्चाचं ऑडिट पाहून ही माहिती संकलित करण्यात करण्यात आली होती. त्यानुसार, भारतीय जनता पार्टीने राज्यातील निवडणुकांसाठी ७८ कोटी २० लाख रुपये हेलिकॉप्टरवर खर्च केले आहेत. तर काँग्रेस पक्षाचा हा आकडा २१ कोटी रुपयांवर जातो. त्याच्या खालोखाल तृणमूल काँग्रेस आणि एआयएडीएमके पक्षांचा खर्चाचा आकडा आहे.

अर्थात, या निवडणुकीनंतर जेव्हा निवडणूक आयोगासमोर पक्ष आपले खर्चाचे आकडे सादर करतील तेव्हा हेलिकॉप्टरवरील खर्चाने अब्जांची भरारी घेतली असेल हे नक्की आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.