PUNE: ईव्हीएम मशिनवर ‘कमळ’ चिन्ह दिसले नाही, आजोबांनी संतापाच्या भरात साधला थेट मतदान अधिकाऱ्यांशी संवाद; पहा Video

पुण्यातील धायरी येथे ही घटना घडली आहे.

296
BJP ची 99 उमेदवारांची यादी जाहीर; दोन आमदारांना डच्चू
BJP ची 99 उमेदवारांची यादी जाहीर; दोन आमदारांना डच्चू

राज्यभरातील ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये मंगळवारी, (७ मे) तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत अनेक पक्ष एकत्र त्यामुळे चिन्ह शोधताना मतदारांची होणारी दमछाक, असेही काही प्रकार पाहायला मिळत आहेत. अशातच ईव्हीएम मशिनवर कमळ चिन्ह न दिसल्याने मतदानासाठी आलेले आजोबा प्रचंड संतापल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे.

पुण्यातील धायरी येथे ही घटना घडली आहे. येथील धायरीच्या काका चव्हाण शाळेत एक आजोबा मतदान केंद्रावर मतदानासाठी आले होते. ईव्हीएम मशीनवर कमळ चिन्ह न दिसल्याने ते सुरुवातीला गोंधळले, पण या प्रकारामुळे ते प्रचंड संतापले. ते फक्त संताप व्यक्त करून थांबले नाहीत, तर त्यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
महायुतीकडून सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्याकडे लढत आहे. बारामतीत महायुतीच्या उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार या घड्याळ चिन्हावर लढत आहेत. त्यामुळे ईव्हीएमवर कमळ चिन्ह देण्यात आले नाही, हा मुद्दा मतदान अधिकाऱ्यांना सांगत आजोबांनी मतदान अधिकाऱ्यांशी वाद घालून आपला राग व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.