-
ऋजुता लुकतुके
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी भारतीय संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पाठवणार की नाही या प्रश्नाला स्पष्ट उत्तर दिलं आहे. दोन देशांदरम्यानचे राजनयिक संबंध आणि सीमेवर नेमकी काय परिस्थिती असेल यावर हा निर्णय अवलंबून असेल, असं सांगतानाच, भारतीय संघाला पाठवायचं की नाही, याचा निर्णय सर्वस्वी केंद्रसरकारचा असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पाकिस्तानमध्ये प्रस्तावित आहे. ही आयसीसीची स्पर्धा असल्यामुळे बीसीसीआयला एकतर्फी निर्णय घेता येणार नाही.
भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध बिघडल्याचा खूप मोठा फटका भारत – पाक क्रिकेटला (Indo – Pak Cricket) बसला आहे. २००८ पासून भारत व पाकिस्तान संबंध ताणलेले आहेत. आणि डिसेंबर २०१२ मध्ये दोन देश शेवटची क्रिकेट मालिका खेळले होते. त्यानंतर आयसीसीच्या विविध स्पर्धा आणि आशिया चषक या स्पर्धांमध्येच दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. पाकिस्तान संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात येऊन गेला. पण, भारतीय संघाने २००८ नंतर पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. आणि चॅम्पियन्स करंडक नेमका पाकिस्तानमध्ये होणार आहे.
(हेही वाचा – IPL 2024, Hybrid Cricket Pitch : धरमशालातील मैदानातील हाय-ब्रीड खेळपट्टी वापरासाठी खुली)
बीसीसीआयने अजून तरी या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवणार का, याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना राजीव शुल्का (Rajeev Shukla) म्हणाले की, ‘भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा निर्णय काही महत्त्वाच्या मुद्यांवर अवलंबून आहे. राजनयिक संबंध आणि भारतीय संघाची सुरक्षा हे मुद्दे तर आहेतच. शिवाय संघाला पाठवायचं झाल्यास केंद्रसरकारची परवानगी लागेल.’ (Indo – Pak Cricket)
#WATCH | Delhi: On the Champion Trophy to be held in Pakistan next year, BCCI vice-president Rajeev Shukla said, “In the case of the Champion Trophy, we will do whatever the Government of India will tell us to do. We send our team only when the Government of India gives us… pic.twitter.com/TeA3dZ5Twn
— ANI (@ANI) May 6, 2024
(हेही वाचा – Supreme Court: मुंबई दंगलीसंदर्भातील निर्देशांची अंमलबजावणी त्वरीत करा – सर्वोच्च न्यायालय)
गेल्यावर्षी पाकिस्तानने आशिया चषकाचं आयोजन केलं तेव्हा भारत – पाक (Indo – Pak Cricket) सामन्याबरोबरच भारताचे इतरही साखळी सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते. पण, यावेळी पाकिस्तानने अशा कुठल्याही तडजोडीला नकार दिला आहे. आणि पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी भारतावर दबाव आणावा अशीच त्यांची आयसीसीकडे मागणी आहे. २०१७ ची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पाकिस्तानने जिंकली होती. त्या जोरावरच स्पर्धेच्या आयोजनाची संधी पाकिस्तानला मिळाली आहे. आणि ही संधी साधून पाकिस्तान क्रिकेट मंडळाला आर्थिक संकटातून बाहेर पडायचं आहे. आणि त्यासाठी भारताने पाकिस्तानमध्ये खेळावं, किंवा निदान भारताला नुकसान भरपाई द्यावी, असा पवित्रा पाकिस्तानने घेतला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community