भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) केरळच्या किनाऱ्याजवळ, बेपोरच्या पश्चिमेला असलेल्या समुद्री भागातून ६ भारतीय कर्मचाऱ्यांसह एक इराणी मासेमारी बोट ताब्यात घेतली. आयसीजीच्या बोटी आणि विमाने यांच्या वेगवान समुद्री-हवाई समन्वयासह ही यशस्वी कारवाई करण्यात आली. (Indian Coast Guard)
इराणी बोटीला अडवल्यानंतर, आयसीजीच्या जवानांच्या तुकडीने बोटीवर प्रवेश केला आणि देशविरोधी कारवायांमधील सहभागाचा शोध घेण्याच्या दृष्टीने या बोटीची कसून तपासणी करण्यात आली. प्राथमिक चौकशीअंती असे दिसून आले की, या बोटीचा मालक इराणी नागरिक असून त्याने तामिळनाडूमधील मासेमारांना कंत्राटी स्वरूपाच्या व्यवहारातून बोटीवर काम दिले आणि त्यांना इराणजवळील समुद्रात मासेमारी करण्यासाठी इराणी व्हिसा मिळवून दिले. (Indian Coast Guard)
(हेही वाचा – Nirmala Sitharaman: अर्थमंत्री सीतारामन यांनी न्यायमूर्ती (निवृत्त) संजय कुमार मिश्रा यांना जीएसटीएटीचे पहिले अध्यक्ष म्हणून दिली शपथ )
त्या बोटीवरील भारतीय कामगारांनी असा आरोप केला आहे की बोटीच्या मालकाने त्यांना वाईट वागणूक दिली आणि मूलभूत जीवनावश्यक बाबींपासून त्यांना वंचित ठेवले तसेच त्यांचे पासपोर्टदेखील आपल्या ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेली बोट अधिक तपासासाठी कोची येथे सुरक्षितपणे आणण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community